शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीनिमीत्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 18:42 IST

अकोला: महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमीत्त येत्या २३ मार्च रोजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे.

अकोला: महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमीत्त येत्या २३ मार्च रोजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे. रौप्यमहोत्सवी शिवजयंती सोहळ््याला विशेष निमंत्रित म्हणून प.पु.आचार्य श्रीनाथपिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांची उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबांना मदत केली जाईल. यावेळी रेणूका नगरस्थित जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात भव्यदिव्य असा शिवनेरी किल्ला साकारण्यात आल्याची माहिती उपमहापौर वैशाली शेळके यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जुने शहरातील डाबकी रोड परिसरात मागील २४ वर्षांपासून जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठाणच्यावतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा २३ मार्च शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त रेणूका नगरमध्ये भव्य शिवनेरी किल्ला उभारण्यात आला असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमहापौर वैशाली शेळके यांनी यावेळी दिली. यंदा कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील देवनाथमठाचे प.पु.आचार्य श्रीनाथपिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांची उपस्थित लाभणार आहे. यासोबतच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत सामाजिक क्षेत्रा तील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्याचे उपमहापौर शेळके यांनी सांगितले. २३ मार्च रोजी जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शिवरायांचे मुतीर्पुजन केले जाणार असून ६ ते ७ यादरम्यान शेतकरी कुटुंबियांना विविध स्वरूपात मदत दिली जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता शिवरायांच्या मिरवणुकीला प्रारंभ होऊन डाबकी रोड मार्गे कस्तुरबा गांधीरूग्णालयामागील श्री संत गाडगे बाबा व्यायाम शाळा तथा आखाडा येथे रात्री १० वाजता मिरवणुकीचा समारोप होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी यावेळी दिली. शिवरायांचा आदर्श डोळ््यासमोर ठेऊन या कार्यक्रमात समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला जाणार असून शिवरायांचा नेत्रदिपक सोहळा पाहण्यासाठी समस्त अकोलकरांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना शहर प्रमुख अतूल पवनिकर, राष्ट्रवादीचे मा.नगरसेवक मनोज गायकवाड, जय बाभळेश्वर सामाजिक प्र ितष्ठाणचे अध्यक्ष राजेश शाहू यांनी केले. पत्रकार परिषदेला भाजप नगरसेवक सुनील क्षिरसागर, अनिल गरड, सतिष ढगे, तुषार भिरड, नगरसेविका रंजना विंचनकर, नंदाताई पाटील, मा.नगसेविका मंगला म्हैसने, डाबकी रोडवासी कावडचे पदाधिकारी संदीप पवार, काँग्रेसचे पदाधिकारी विलास गोतमारे, शाम विंचनकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी