शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो... लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही सेकंड डोस घेतलाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : ‘हॅलो... अमूक-अमूक बोलताय का?... मी लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : ‘हॅलो... अमूक-अमूक बोलताय का?... मी लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे का?... नसेल तर लवकरच जवळच्या केंद्रावर या आणि दुसरा डोस लावून घ्या’, अशी विचारणा करणारे फोन दुसरा डोस न घेतलेल्या अकोलेकरांना येत आहेत. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करत असल्याने, आरोग्य विभाग अशा लोकांना फोन करून लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, शासनाकडून लसीकरण मोहिमेला गती देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. जिल्ह्यातील १४,२४,२६८ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, १२ सप्टेंबरपर्यंत ५,४३,२१७ नागरिकांचा पहिला डोस घेऊन झाला आहे, तर २,२३,६३५ नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची एकूण संख्या ७,६६,८५२ एवढी आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ १५.७० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतले तरच कोरोना संसर्ग टाळला जाऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.

शहरातील लसीकरण केंद्र

नागरी आरोग्य केंद्र, खदान १६ क्रमांक शाळा

नागरी आरोग्य केंद्र, सिंधी कॅम्प खडकी

नागरी आरोग्य केंद्र, नायगाव एपीएमसी मार्केट

आर. के. टी. आयुर्वेदिक महाविद्यालय

कस्तुरबा रुग्णालय, डाबकी रोड

नागरी आरोग्य केंद्र, अशोक नगर

नागरी आरोग्य केंद्र, विठ्ठल नगर, मोठी उमरी

नागरी आरोग्य केंद्र, हरिहर पेठ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

आयएमए हॉल, सिव्हील लाईन चौक

भरतीया रुग्णालय, टिळक रोड

जिल्हा स्त्री रुग्णालय

नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर, मनपा शाळा क्रमांक २२

३५ हजार नागरिक दुसऱ्या डोसच्या उंबरठ्यावर

पहिला डोस पूर्ण केलेल्यांपैकी जवळपास ३५ हजार नागरिकांची दुसरा डोस घेण्याची तारीख उलटून गेली आहे. त्यामुळे या ३५ हजार नागरिकांना लवकर दुसरा डोस देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. यामध्ये कोव्हॅक्सिन डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

लसीकरणाची स्थिती

उद्दिष्ट १४,२४,२६८

पहिला डोस ५,४३,२१७

दुसरा डोस २,२३,६३५

लस घेतलेले एकूण ७,६६,८५२

जिल्ह्यात दिल्या जाणाऱ्या लसी

कोव्हॅक्सिन

कोविशिल्ड

कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. तिसरी लाट टाळायची असेल तर नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या नागरिकांनी तातडीने दुसरा डोस टाेचून घ्यावा.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला