अकोला : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे. दोन्ही तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. वारी हनुमान सागर धरणात जलसाठा वाढल्याने सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत, तसेच वान नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून संंततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आले आहेत. अनेक मार्गावर पुलावरून पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने वारी हनुमान सागर धरणाचे सहा दरवाजे ५० सेंमी.ने उघडण्यात आले आहेत. वान नदी पात्रामध्ये सहा हजार क्यूसेकनी पाणी सोडण्यात येत आहे. तेल्हारा तालुक्यातील मुख्य नद्या पूर्णा, आस, विद्रुपा, गौतमा, बगडा, लेंडी व सातपुडा पर्वत रांगेतून वाहणारे लहान-मोठ्या नदीनाल्यांना पूर आला आहे. पुलावरून पाणी असल्याने मुख्य वाहतुकीचे तेल्हारा, मुंडगाव,अकोट, हिवरखेड, अकोट, बेलखेड, अकोली सिरसोली,अकोट, मनब्दा, अकोला, तेल्हारा, वरवट या रस्त्यांवरील एसटी बस व इतर वाहतूक बंद होती, तसेच वरूड भोकर, काळेगाव, मनब्दा, अटकही गावांना पुराचा वेढा असल्याने संपर्क तुटला होता.अकोल्यात २६.६ मि. मी.पाऊस४जिल्ह्यात गुरुवार, सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत अकोला येथे २६.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मागील चोवीस तासांत गुरुवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत अकोला जिल्ह्यातील अकोट येथे सर्वाधिक ६० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तेल्हारा तालुक्यात ४० मिमी, मूर्र्तिजापूर ३० मिमी, बार्शीटाकळी व पातूर २० मिमी पाऊस झाला.
२७ मजुरांची सुटकाअकोट तालुक्यातील देवरी गावानजिक फॉरेस्टमधील रोपवनाच्या कामासाठी आलेल्या २७-३० कोरकु मजूर चंद्रीका नदी आणि चिखल रोड नाल्याला पूर आल्यामुळे नदी आणि नाल्याच्या दोन्ही साईटच्यामध्ये अडकले आहेत. या मजुरांना अकोटला जाण्यासाठी मार्ग नाही. जर रात्री पुराचे पाणी वाढले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. यासाठी फॉरेस्टचे आर.ओ.बावने यांनी संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तत्काळ या मजुरांची सुटका करून घेण्यासाठी पाचारण केले. बचाव पथक तातडीने मजुरांना पुरातून काढण्यात यश प्राप्त झाले.