शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे जीवाची लाही लाही; कार्यकर्ते म्हणतात, ‘एसी’कार द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:30 IST

अकोला लोकसभा मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढताना नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कार्यकर्त्यांकडून ‘एसी’ कारची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देउन्हाचा पारा ४४ अंशावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे.याचा परिणाम उमेदवारांनी आखलेले दौरे, कॉर्नर बैठकांवर होत असल्याचे बोलल्या जात आहे.नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कार्यकर्त्यांकडून ‘एसी’ कारची मागणी केली जात आहे.

अकोला: एरव्ही नेत्यांची जोशपूर्ण भाषणे, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने निवडणुकीचा पारा चढत असल्याचा अनुभव येतो. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार पाहावयास मिळत असून, मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा ४४ अंशावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवाची लाही लाही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढताना नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कार्यकर्त्यांकडून ‘एसी’ कारची मागणी केली जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच येत्या १८ एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात दंड थोपटून असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी आता केवळ दहा दिवसांचा अवधी उरला आहे. लोकसभा मतदारसंघात रिसोडसह सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, जिल्ह्याच्या कानाकोपºयात पोहोचून मतदारांशी संपर्क साधण्याचे आव्हान विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर उभे ठाक ले आहे. प्रचाराचा कालावधी लक्षात घेता उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते काटेकोरपणे नियोजन करून घराबाहेर निघत आहेत. नियोजन करण्यामध्ये महायुती व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अग्रेसर असल्याचे चित्र आहे. सकाळी ८ वाजता स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी निघत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या दिवसापासूनच जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशाच्या पार गेल्याचे दिसून येते. मागील आठ दिवसांपासून सूर्यनारायण आग ओकू लागले असून, पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. याचा परिणाम उमेदवारांनी आखलेले दौरे, कॉर्नर बैठकांवर होत असल्याचे बोलल्या जात आहे.नियोजनात ऐनवेळेवर बदलतापत्या उन्हामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारांना त्यांच्या पूर्वनियोजनात ऐनवेळेवर बदल करावे लागत आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ४ पर्यंत ग्रामीण भागातील मतदारांशी संपर्क साधताना अडचणी येत आहेत. रखरखत्या उन्हामुळे कार्यकर्त्यांना मतदारही भेटत नसल्याची परिस्थिती आहे.धावता प्रचार; जिल्हा पिंजून काढण्याचे आव्हाननिवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात आहे. युवा, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाला प्राधान्य दिले जात असले तरी आजही मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावरच उमेदवारांचा भर दिसून येत आहे. प्रचारासाठी कमी कालावधी पाहता उमेदवारांसमोर जिल्हा पिंजून काढण्याचे आव्हान असून, त्याकरिता धावता प्रचार केला जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक