शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवर आज सुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

अकोला : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या आचारसंहिता कालावधीत २३ जून रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात ...

अकोला : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या आचारसंहिता कालावधीत २३ जून रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरुध्द विरोधकांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या अपीलवर मंगळवार, २० जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पोटनिवडणुका होत असलेल्या संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. आचारसंहिता कालावधीत २३ जून रोजी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. आचारसंहितेच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करीत, यासंदर्भात जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर व सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले. या अपीलवर २० जून रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहेत. या सुनावणीत विभागीय आयुक्तांकडून काय आदेश देण्यात येतो, याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.