शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

योजनांमध्ये मागे असलेल्या ग्रामसेवकांची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 11:00 IST

३१ जुलैपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने शेवटच्या पाच ग्रामसेवकांची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सुनावणीत झाडाझडती घेतली जाणार आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या ग्रामसेवकांची ३ आॅगस्ट रोजी सुनावणी घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ३१ जुलैपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने शेवटच्या पाच ग्रामसेवकांची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सुनावणीत झाडाझडती घेतली जाणार आहे.जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर विविध योजना राबविण्यासाठीचे उद्दिष्ट तसेच कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यापैकी तीन योजनांची कालमर्यादा ३१ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्या उद्दिष्टापैकी सर्वात कमी साध्य असलेल्या पाच ग्रामसेवकांची थेट मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. ३ आॅगस्ट रोजी संबंधित ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेत उपस्थित राहावे लागणार आहे. सुनावणीमध्ये प्रशासकीय कारवाईस पात्र ठरणाºया ग्रामसेवकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांना दिले आहे.

- योजनांचा पाठपुरावाग्रामसेवकांनी ३१ जुलैपर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी तीन योजना ठरवून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांची अंमलबजावणी करण्याचे विषय आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी राबविलेल्या योजनांचा आढावा घेऊन सर्वात मागे असलेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद