अकोला : बिर्ला ऑइल मिल प्रकरणात कामगारांची देणी देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असलेल्या खटल्यात शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होत आहे. अकोला ऑइल मील नावाने असलेल्या बिर्ला कंपनी बंद पडल्यामुळे ५00 पेक्षा अधिक कामगार बेरोजगार झाले. यातील १४१ कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अनेकांना गंभीर आजाराने ग्रासले आहे. असे असतानाही न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे कामगारांना त्यांची देणी अद्याप मिळाली नाही. या प्रकरणात आता १६ ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होत असून यावेळी न्याय मिळेल आणि थकित देणी देण्याबाबत न्यायालय निर्णय देईल, अशी अपेक्षा कामगारांना आहे.
बिर्ला प्रकरणात उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी
By admin | Updated: October 12, 2015 01:59 IST