शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

रूग्णांच्या ‘हाकेला ओ’ देणारा आरोग्य दूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:04 IST

अकोला :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय असो,  जिल्हा स्त्री रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही खासगी रुग्णालय.. या ठिकाणी रुग्णांना घेऊन येणार्‍या गाव-खेड्यांमधील भोळय़ा-भाबळय़ा नागरिकांना जेव्हा काहीच सुचेनासे होते, तेव्हा त्यांची मदत करण्यास येथील एक ध्येयवेडा आरोग्य दूत सदैव तयार असतो.

ठळक मुद्दे१0 वर्षांपासून करतोय समाजकार्य

अतुल जयस्वाल। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय असो,  जिल्हा स्त्री रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही खासगी रुग्णालय.. या ठिकाणी रुग्णांना घेऊन येणार्‍या गाव-खेड्यांमधील भोळय़ा-भाबळय़ा नागरिकांना जेव्हा काहीच सुचेनासे होते, तेव्हा त्यांची मदत करण्यास येथील एक ध्येयवेडा आरोग्य दूत सदैव तयार असतो.  जात, धर्म,  पंथ असा कोणताही भेद न करता गरजू रुग्णांना मदत करण्यातून आत्मिक आनंद मिळविणार्‍या या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे, पराग रामकृष्ण गवई.शासकीय रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या गरजू रुग्णास रक्ताची गरज असो किंवा डॉक्टरांची मदत.. एक फोन करा.. पराग मदतीला धावून येतो. समाजकार्याचा वसा घेतलेला पराग हा गत दहा वर्षांपासून सवरेपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय या ठिकाणी गाव-खेड्यांमधून येणार्‍या रुग्णांना सर्व प्रकारची मदत करीत आहे. मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे केवळ रक्तदानातून ही गजर पूर्ण करता येते, हे चांगल्याप्रकारे ओळखून असलेला पराग हा रक्तदान शिबिरांचे आयोजन करून, सवरेपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीला मदत करतो. त्याने आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने आतापर्यंत २८ वेळा रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. एवढेच नव्हे, तर त्याने स्वत: ३३ वेळा रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. याशिवाय गावागावांमध्ये जाऊन तेथील युवकांना रक्तदान शिबिरे घेण्यासाठी पराग प्रोत्साहित करतो. त्याच्या प्रोत्साहनामुळे गतवर्षी ग्रामीण भागात १६ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली.  दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परागचे सहकारी अशोक वाटिका येथे रक्तदान शिबिर घेतात. सवरेपचार रुग्णलयात भरती असलेल्या रुग्णांनाही पराग मदत करतो. परागच्या या सेवाभावी  वृत्तीमुळे सवरेपचारमधील डॉक्टरही त्याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. लोकांची सेवा करण्याचे ब्रिद घेतलेल्या पराग गवईचा अनेक सामाजिक संस्थांनी गौरव केला आहे.  पराग हा रुग्णांच्या मदतीसोबतच गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यातही नेहमीच पुढे असतो.भारिप-बमसंचा सामान्य कार्यकर्ता म्हणून समाजकार्य करणारा पराग जिल्हा शांतता समितीचाही सदस्य असून, सामाजिक सलोखा ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. प्रत्येकाशी विन्रमतेने संवाद साधणार्‍या परागचा लाघवीपणा त्याच्या सेवा कार्याला संस्मरणीय करतो.

दीडशे रक्तदात्यांची फळीपराग गवई हा मुख्यत्वे रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत असून, यासाठी तो जीवाचे रान करीत आहे. त्याच्याकडे विविध रक्तगट असलेल्या दीडशे युवक-युवतींची फळी आहे. गरज पडल्यास तरुण रक्तदात्यांची ही फळी रक्तदानासाठी सदैव तत्पर असते. सवरेपचार रुग्णालयात एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासली व तो रक्तगट रक्तपेढीकडे उपलब्ध नसला, तर डॉक्टर परागला हव्या असलेल्या रक्तगटाबाबत सांगून त्याला मदत करण्याबाबत सांगतात.

टॅग्स :Akola cityअकोला शहरsocial workerसमाजसेवक