शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या माहितीसाठी शिक्षकासह मुख्याध्यापकही जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:35 IST

चुकीची माहिती शिक्षकांनी भरल्यास त्यांच्यासह मुख्याध्यापकालाही जबाबदार धरून कारवाई करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले.

अकोला: जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी गेल्या वर्षी शिक्षकांनी खोटे अंतर, आजाराची चुकीची माहिती दाखवून सोयीच्या जागा पटकावल्या. ही बाब उघड झाल्यानंतर शिक्षकांवर कारवाई करणे कठीण झाले. आता चुकीची माहिती शिक्षकांनी भरल्यास त्यांच्यासह मुख्याध्यापकालाही जबाबदार धरून कारवाई करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले. त्यामुळे अर्ज आणि माहिती भरण्याची प्रक्रिया मुख्याध्यापकांना डोळ््यात तेल घालून करण्याची वेळ आली आहे.जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सुधारित धोरण निश्चित केले. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षकांची व्याख्या देण्यात आली. त्या आदेशातील बदलीपात्र शिक्षकाच्या व्याख्येत ग्रामविकास विभागाने ८ मार्च २०१९ रोजी बदल केला. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षक म्हणजे, ज्या शिक्षकाची बदलीस निश्चित धरावयाची सेवा १० वर्षे पूर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत त्या शिक्षकाची सेवा किमान तीन वर्षे पूर्ण झाली आहे, असा बदल केला आहे. या बदलानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित शिक्षकाची सर्वसाधारण व अवघड क्षेत्रात १० वर्षे सेवा झाली असल्यास ते शिक्षक बदलीपात्र समजण्यात आले; मात्र सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक एकदा बदली झाल्यानंतर जोपर्यंत अवघड क्षेत्रात जात नाहीत, तोपर्यंत ते बदलीसाठी पात्र ठरतात. त्यामुळे नवीन धोरणानुसार त्यांची दरवर्षी बदली होऊ शकते, ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेतून न्यायालयापुढे मांडण्यात आली. त्यावेळी शासनाने बदलीपात्र शिक्षकांची संगणकीय प्रणालीद्वारे एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा तीन वर्षे त्यांची बदली केली जाणार नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले. त्यासाठी बदली प्रक्रियेचा २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या बदल करण्यात आला. अकोला जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी ट्रान्सफर पोर्टल सुरू झाले आहे. त्याची मुदत ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ट्रान्सफर पोर्टलसाठी मुख्याध्यापकांचे लॉगिन महत्त्वाचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून सोयीच्या ठिकाणी बदली मिळवली तर त्यासाठी शिक्षकासोबतच संबंधित मुख्याध्यापकालाही जबाबदार धरले जाणार आहे. लॉगिनवरून कोणताही शिक्षक चुकीची माहिती भरणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. बदली प्रक्रियेशी संबंधित अडचणीसाठी पंचायत समितीमध्ये मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला. तसेच संवर्ग दोनमध्ये गुगल मॅपिंगनुसार सर्वात जवळचे अंतर गृहीत धरले जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक