शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या घरात तलवार घेऊन घुसलेल्या चौघांचा धुडगूस

By admin | Updated: April 28, 2017 02:11 IST

घरातील साहित्य तोडफोड: मूर्तीचीही विटंबना, जुन्या वादातून मारहाण

अकोला : जुन्या वादातून चार युवकांनी तलवार घेऊन रमाबाई आंबेडकर नगरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून साहित्याची तोडफोड करून महापुरुषांच्या मूर्तीची विटंबना केली आणि महिला व तिच्या पतीस मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वाशिम बायपास रोडवरील रमाबाई आंबेडकर नगरात राहणाऱ्या रोशनी सरदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी युवकांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. पोलिसांनी एका आरोपीस अटक केली; परंतु आरोपी जामिनावर बाहेर आल्यावर त्याने व त्यासोबतच्या फैजल, अकबर, छोट्या आणि इमरान नामक युवकांनी हातात तलवार, लोखंडी पाइप घेऊन गुरुवारी रात्री रोशनी सरदार यांचे घर गाठले आणि घरातील वस्तूंची तोडफोड केली. घरातील महापुरुषांच्या मूर्ती फोडून विटंबना केली, तसेच रोशनी सरदार यांच्यासह लखन सरदार यांना मारहाण करून जखमी केले. घटनास्थळाला ठाणेदार रियाज शेख यांनी भेट दिली आणि आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी पथक पाठविले. रोशनी सरदार यांच्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी आरोपी फैजल, अकबर, छोट्या, इमरान नामक युवकांवर भादंवि कलम २९३, ३२४, ३२३, अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला.