शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हातरुण : रेतीची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:09 IST

हातरुण : हातरुण परिसरात रेतीची वाहतूक खुलेआम सुरू असताना महसूल विभागाने दोन वाळूची वाहने पकडून ३१ हजार रुपये दंड ठोठावला. जप्त करण्यात आलेली वाळूची वाहने शिंगोली येथील पोलीस पाटील संतोष बोर्डे यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती हातरुण तलाठी दत्तात्रय काळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे३१ हजारांचा दंड : महसूल विभागाची कारवाई, वाळू वाहतुकीला ब्रेक लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहातरुण : हातरुण परिसरात रेतीची वाहतूक खुलेआम सुरू असताना महसूल विभागाने दोन वाळूची वाहने पकडून ३१ हजार रुपये दंड ठोठावला. जप्त करण्यात आलेली वाळूची वाहने शिंगोली येथील पोलीस पाटील संतोष बोर्डे यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती हातरुण तलाठी दत्तात्रय काळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.हातरुण येथील तलाठी कार्यालयासमोरून वाळूची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. पहाटेच्या वेळेस अवजड वाहनात वाळू भरून ही वाहने जाताना सर्रास दिसून येतात. या वाळू वाहतुकीला लगाम लावण्याची मागणी नागरिकांनी तलाठी काळे यांच्याकडे केली होती. हातरुण महसूल विभागाच्या पथकाने दोन वाळू वाहनांवर कारवाई करीत ३१ हजार रुपये दंड ठोठावला आहे. कवठा बहादुरा येथून हातरुण मार्गे ही वाळू वाहतूक होत असून, एम. एच. २८ बी. ९0७३ या वाहनात एक ब्रास वाळू अंदाजित किंमत पंधरा हजार आठशे तेहत्तीस रुपये आणि एम. एच. ३0 ए.बी. १९८१ वाहनात एक ब्रास वाळू अंदाजित किंमत पंधरा हजार आठशे तेहत्तीस रुपये असा एकूण एकतीस हजार सहाशे सहासष्ठ रुपये दंडाची कारवाई महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी केली. हातरुण महसूल विभागाच्या या पथकात मंडळ अधिकारी मेश्राम, हातरुण तलाठी काळे, हाता २ चे तलाठी दिवाकर ताले, हाता तलाठी धम्मपाल नकाशे यांचा समावेश होता. महसूल विभागाने दंडाची कारवाई केलेली दोन्ही वाहने शिंगोली पोलीस पाटील संतोष बोर्डे यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. हातरुण, कारंजा, बोरगाव वैराळे, मालवाडा, हाता येथून वाळू वाहतूक होताना दिसल्यास दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे हातरुण मंडळ अधिकारी मेश्राम यांनी सांगितले. 

रस्ते गेले खड्डय़ात!वाळू वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असल्याने वाहनांची रस्त्यावरून स्पर्धाच लागलेली दिसून येते. परिसरातील रस्ते जड वाहतुकीमुळे खड्डय़ात गेले आहेत. हातरुण येथील शाळेसमोरूनच ही वाहने धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण