शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हर्षराज अळसपुरे यांची अखेर दहशतवाद विरोधी कक्षात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 13:31 IST

अकोला- जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांची अखेर दहशतवाद विरोधी कक्षात बदली करण्यात आली आहे.

अकोला:  जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांची अखेर दहशतवाद विरोधी कक्षात बदली करण्यात आली आहे. अवैध धंदयांचा कर्दनकाळ असलेल्या अळसपुरेंच्या बदलीमुळे माफियांच्या कृत्याला यश मिळाल्याची चर्चा खात्यात जोरात सुरू आहे. जुगार अड्डे, वरली अड्डे, क्लब, दारुची अवैध विक्री करणारे माफिया, रेती माफिया, गुटखा माफिया यांच्यावर केलेल्या धडाकेबाज कारवायानंतर त्यांच्या बदलीसाठी फिल्डींग लावण्यात आली होती.जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना हर्षराज अळसपुरे यांनी केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या काळात कारमधून नोटांची वाहतूक करणाऱ्यांवर छापेमारी करून कारवाई केली होती. या कारवायांमुळेतत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी ७ मार्च २०१७ रोजी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्यावर दिली होती. अळसपुरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदयावर छापेमारी करीत त्यांना सळो की पळो करून सोडले. याचप्रकारे गुटखा माफियांवरही कारवाईचा सपाटा लावला. त्यानंतर गुरे तस्करांच्या मुसक्या आवळत जिल्ह्यातील सर्वाधिक गुरांना वाचविण्याचे कामही या पथकाने केले. रेती माफिया, बिल्डरवर कारवाई करण्यात आली. वाशिम येथील नगराध्यक्षांच्या हत्याकांडातील आरोपींना अटक केली तर स्वस्तात सोन्याचे आमिष देऊन बनावट नोटांचा खेळ करणाºया टोळ्यांच्या मुसक्याही हर्षराज अळसपुरेंनी आवळल्या. त्यामुळे माफियांसाठी डोकेदुखी ठरत असतानाच त्यांच्या बदलीसाठी फिल्डींग लावण्यात आली.विशेष पथकाची कामगिरीजुगार अड्ड्यांवर १६९ कारवाया करीत ६९२ आरोपींना अटक. त्यांच्याकडून ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त, कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या २८३ गुरांना जीवनदान देऊन ४० आरोपींना अटक. दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाºया ५५ जणांवर कारवाई करीत ९० आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, गौण खनिज चोरी प्रकरणात ६ कारवाया केल्या असून, २६ आरोपी अटकेत तर ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त. गुटखा माफियांवर २५ कारवाया करीत तब्बल १२ कोटी ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त.चर्चेतील कारवायाकॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करीत बनावट पुस्तके विक्रेत्यांवर कारवाई. जिल्हा परिषदेच्या हुक्काबाज शिक्षकांवर अकोल्याच्या इतिहासातील पहिलीच कारवाई करण्यात आली. स्फोटक साठा ठेवणाºयांवर कारवाईचा सपाटा तसेच मांडुळ जातीचा साप तस्करी करणारी टोळी अटक केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसAnti Terrorist Squadएटीएस