शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारी, हार्डशिपच्या प्रस्तावावरून आयुक्त-भाजपमध्ये बिनसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 14:21 IST

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जारी केल्यामुळे मनपात प्रस्ताव रखडल्याची बाब भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.

- आशिष गावंडेअकोला: शहरातील गुंठेवारीच्या जमिनीवरील आरक्षणाचा मुद्दा असो किंवा हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंगच्या नियमावलीवर नगरविकास विभागाचे धोरण स्पष्ट नसताना अशा प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या मुद्यावरून महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ व भाजपमधील काही नेत्यांमध्ये चांगलेच बिनसल्याची माहिती आहे. एकीकडे हार्डशिपच्या नियमावली अंतर्गत मनपात प्रस्ताव पडून असतानाच दुसरीकडे ही नियमावली लागू न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जारी केल्यामुळे मनपात प्रस्ताव रखडल्याची बाब भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.राज्य शासनाने डिसेंबर २०१५ पूर्वी उभारलेल्या अनधिकृत इमारतींना अधिकृत करण्याचा निर्णय जाहीर केला. अशा इमारतींना अधिकृत करण्यासाठी हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंगची नियमावली लागू करण्यात आली. या नियमावली अंतर्गत संबंधित मालमत्ताधारकांनी महापालिकेत प्रस्ताव सादर करणे व शासनाने आकारलेले शुल्क (दंड) जमा केल्यास महापालिका प्रशासनाने सदर प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश होते. शासनाने हार्डशिपची नियमावली लागू केली असली, तरी आकारलेले शुल्क बांधकाम व्यावसायिक व मालमत्ताधारकांच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे निदर्शनास येताच हार्डशिपसंदर्भात नव्याने सूचना, हरकती व आक्षेप बोलावले. राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांची स्थिती लक्षात घेता हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंगचे शुल्क ठरविण्याचा अधिकार महापालिकेला सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार होती.महापालिकेत काय घडले?शासन स्तरावरून हार्डशिपचे शुल्क निश्चित करण्याचा अधिकार मनपाला देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शहरातील काही बांधकाम व्यावसायिक व मालमत्ताधारक अशा सुमारे २२० पेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी मनपाकडे हार्डशिप अंतर्गत प्रस्ताव सादर केले. प्रस्ताव सादर केल्यानंतर मनपाने आकारलेले शुल्क पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे संबंधितांनी शुल्क जमा करण्याकडे पाठ फिरविली. शिवाय, या मुद्यावर शासनाची भूमिका लक्षात घेता मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनीसुद्धा सुधारित आदेश येईपर्यंत प्रस्ताव बाजूला सारले. ही बाब भाजपमधील काहींच्या जिव्हारी लागल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBJPभाजपा