शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

मराठा आरक्षण वैध ठरल्याचा आनंदोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:40 IST

मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल शहरात आतषबाजी करू न आणि मिठाईचे वाटप करू न आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश रणजित मोरे यांनी गुरुवारी मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के व नोकरीत १३ टक्के आरक्षण जाहीर केले. मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल शहरात आतषबाजी करू न आणि मिठाईचे वाटप करू न आनंदोत्सव साजरा करण्यात आला.मराठा आरक्षणाकरिता मराठा समाजातील ४२ तरुणांनी बलिदान केले. मराठा क्रांती मूक मोर्चाने प्रत्येक मराठा बांधव जागृत झाला. अनेक मराठा संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू न वेळोवेळी संघर्ष केला. जवळपास चौदा हजारांच्यावर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. त्यापूर्वी औरंगाबाद येथून भय्यूजी महाराज यांच्या प्रेरणेने मराठा आरक्षणाची ज्योत पेटली होती. भय्यूजी महाराज यांच्या प्रेरणेने औरंगाबाद येथून मराठा आरक्षणाची ज्योती पेटली होती. मराठा आरक्षणाच्या लढ्यात शहीद झालेल्या तरुणांना आणि कोपरडी येथील तरुणीला आज आरक्षण मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरली आहे. राज्यातील मराठा समाजातील रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला आहे, अशा यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल शहरात शिवाजी पार्क येथे तरुणाईने फटाके फोडून व मिठाईचे वाटप करू न आनंदोत्सव साजरा केला. अखिल भारतीय सह्यांद्री मराठा संघटना संस्थापक अध्यक्ष डॉ. मकरंद पाटोळे, प्रदेशाध्यक्ष डॉ. काशीनाथ पटेकर, जिल्हाध्यक्ष अमन पाटील, अनिल कानगुडे, जय देशमुख, अविनाश देशमुख, छत्रपती पाटोळे, अमोल गुंजाळ, शुभम पाटोळे, वैभव पाटोळे, नितीन मोरे, अक्षय नलावडे, गजानन देव, प्रमोद बरडे, आकाश पावले, रोहित देशमुख, भय्यू देशमुख, गीतेश सोने, राजेश पवार, दिनेश देव व संग्राम मोहिते या आंनदोत्सवात सहभागी झाले होते.मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी बसस्थानक चौकात सायंकाळी भगवे ध्वज उंचावले. आतषबाजी आणि नागरिकांना मिठाईचे वाटप करू न आनंदोत्सव साजरा केला. ‘एक मराठा-लाख मराठा’, अशा घोषणांनी आसमंत दुमदुमले. यावेळी डॉ. अभय पाटील, युवराज गावंडे, चंद्रकांत झटाले, सागर कावरे, रामभाऊ वाघमोडे, अविनाश पवार, मनोहर हरणे यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाMaratha Reservationमराठा आरक्षण