शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग कोरोना रुग्णाला दोन तास ठेवले रुग्णवाहिकेतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:21 IST

कोणीच मदतीसाठी पुढे न आल्याने त्या दिव्यांग रुग्णाला तब्बल दोन तास रुग्णवाहिकेतच राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ५५ वर्षीय दिव्यांग रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले; परंतु या ठिकाणी वॉर्डात नेण्यासाठी कोणीच मदतीसाठी पुढे न आल्याने त्या दिव्यांग रुग्णाला तब्बल दोन तास रुग्णवाहिकेतच राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सिंधी कॅम्प परिसरातील ५५ वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांना २५ जुलै रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णालयातर्फे त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. यामध्ये बुधवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टमध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांना रुग्णवाहिकेद्वारे सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे कोणीच रुग्णाला रुग्णावाहिकेतून काढण्यास मदतीसाठी समोर आले नाही. रुग्णाच्या नातेवाइकांनी तथा काही समाजसेवकांनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला; परंतु येथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना नकार दिला. तब्बल दोन तास रुग्णवाहिकेमध्ये ताटकळत बसल्यानंतर त्या दिव्यांग रुग्णाला वॉर्डात नेण्यात आले.कोरोनामुळे माणुसकीचा विसर!जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून माणुसकीचा विसर पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सुरुवातीला कोरोना वॉर्डात कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांपासून शेजारच्यांनी दुरावा केला, तर कधी नातलगाचाच मृतदेह घेण्यास नकार दिल्याच्या घटना समोर आल्यात. तर आता दिव्यांग व्यक्तीला कोरोना असल्याने त्याच्या मदतीलाही कोणी पुढे येत नसल्याचा धक्कादयक प्रकार घडल्याने माणुसकीचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिव्यांग रुग्णांसाठी सुविधा नाहीच!सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र येथे येणाºया दिव्यांग रुग्णांसाठी कुठलीच सुविधा नसल्याचे वास्तव गुरुवारच्या घटनेवरून समोर आले.

रुग्णसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत खाटांची संख्या कमी पडत आहे. नवीन रुग्णांसाठी खाटांची तडजोड करावी लागते. जिल्ह्याबाहेरून येणाºया रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयावरील ताण वाढत आहे. नवीन हॉस्पिटल किंवा इतर पर्यायाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यामुळे लवकरच खाटांच्या कमतरतेवर तोडगा काढण्यात येईल.- डॉ. मीनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या