शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वल्लभनगर, केळीवेळी परिसरात गारपीट

By admin | Updated: October 7, 2014 02:12 IST

वादळी वा-यामुळे टीनपत्रे उडाली, घरांची पडझड.

वल्लभनगर (अकोला): विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह आलेला परतीचा पाऊस आणि गारपिटीने सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी अकोला तालुक्यातील वल्लभनगर व आकोट तालुक्यातील केळीवेळी परिसराला झोडपून काढले. वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या घरांवरची टीनपत्रे उडून गेली, तर काही घरांची पडझड झाली. गत काही दिवसांपासून प्रचंड उकाडा व तापमान वाढल्याच्या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा असताना सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वल्लभनगर, निंभोरा, हिंगणा तामसवाडी, सांगवी खुर्द, कासली खुर्द, कासली बुद्रुक, केळीवेळी, रोहणा, काटी, पाटी आदी गावांत पावसाने दमदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा व गारपिटीसह अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. सुमारे दहा मिनीट बोराच्या आकाराएवढी गार कोसळल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. वार्‍याचा वेग एवढा प्रचंड होता की, अनेकांच्या घरांवरची टीनपत्रे उडाली. वृक्ष उन्मळून पडली, तर काही जणांच्या घरांची पडझड झाली. केळीवेळी येथे विद्युत तारा तुटून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. निंभोरा येथील वामनराव इतवारे व कासली बु. येथील महादेवराव सोळंके यांचे घर कोसळले. कासली बु. येथील नागोराव इंगळे यांच्या घराची भिंत कोसळली, तर ग्रामपंचायत कार्यालयावरचे संपूर्ण टीनपत्रे उडून गेली. गारपीट झाली तेव्हा परिसरातील शेतकरी शेतात काम करीत होते. अचानक झालेल्या गारपिटीमुळे अनेक जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते.