शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मूर्तिजापूर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेकडो एकरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 17:43 IST

Hailstorm : अचानक आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेकडो एकरवरी पिकांचे नुकसान झाले आहे.

मूर्तिजापूर : तालुक्यात अचानक आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेकडो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात तुर हरभरा, गहू, कांदा भाजीपाला व फळबागांचा समावेश आहे. मंगळवार दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली धोधो पावसासह गारपीट झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील निंभा, कमळणी कमळखेड, धोत्रा शिंदे, धानोरा पाटेकर, अनभोरा, शेंद, बिडगाव, शिवण खुर्द, राजूरा घाटे, मोहखेड, मुरंबा, उमरी अरब या गावांसह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने झोडपले दरम्यान बोराच्या आकाराची गार पडली, या गावांत व परीसरात किमान एक तासाच्या वर गारपीट झाल्याने गावात गारांचा खच साचलेला होता. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच बरोबर निंभा येथील गुरांच्या गोठ्यावर तीन ठिकाणी झाडे कोसळल्याने गोठा कोसळून अनेक जनावरे जखमी झालीत, झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
टॅग्स :HailstormगारपीटAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर