शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

फेरीवाल्यांच्या मदतीने होते गुटखा वाहतूक !

By admin | Updated: July 20, 2016 01:26 IST

दुचाकी आणि ओमनी कारमध्ये खुलेआम ने-आण.

सचिन राऊत/ अकोलाबड्या गुटखा माफियांच्या गोदामातील गुटखा पानटपर्‍यांवर पोहोचविण्यासाठी फेरीवाले दुचाकी आणि ओमनी कारद्वारे पोलिसांच्या नाकावर टिच्चून दिवसभर गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गुटखा माफियांवर पोलिसांनी मोठय़ा कारवाया केल्यानंतर गुटखा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले होते; मात्र त्यानंतर गुटखा माफियांनी शहरासह जिल्हय़ातील बहुतांश पोलीस स्टेशनला ह्यमॅनेजह्ण केल्याने त्यांच्यासाठी रान मोकळे झाले आहे. गुटखा माफियांवर संबंधित पोलीस स्टेशनकडून कारवाई होत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाद्वारे कारवाईचा सपाटा लावण्यात आला होता; मात्र त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचा बागुलबुवा उभा करण्यात आला. त्यानंतरही अमरावती येथे महसूल पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा जप्तीसाठी कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना प्रतिबंधित गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाला सोबत घेऊन जप्त करण्याचा अधिकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुटखा जप्त केल्यानंतर पुढील कारवाई पोलिसांनी न करता ती अन्न व औषध प्रशासन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा नियम असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.त्यामुळे या गुटखा माफियांवर आता पुन्हा पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्यास अनेक युवकांना व्यसनाधीनतेपासून रोखल्या जाऊ शकते. राज्यात गुटखा बंदी होऊन १७ जुलै रोजी चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाही नव्याने अधिसूचना निघून वर्षभरासाठी पुन्हा मुदत वाढविली जाईल; मात्र मागील चार वर्षांचा अनुभव पाहता बंदी कागदोपत्री राहिली असून, गुटख्यासह मावा आणि सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री सुरू आहे. तरुण पिढी तोंडाच्या कर्करोगापासून दूर राहावी, या उद्देशाने बंदीचा निर्णय घेण्यात आला. कोणताही निर्णय घेतला की, त्याला पळवाटा शंभर असतात, अशी अवस्था बंदीची झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडील अपुरे मनुष्यबळ, खबर्‍यांच्या जाळ्याची कमतरता यामुळे सरसकट बंदी घालण्यात यश आले नाही.सध्या शहर व जिल्ह्यात यासोबतच सीमा भागात उघडपणे विक्री सुरू आहे. मध्यप्रदेश राज्य सीमेवर असल्याने तेथून उत्पादीत गुटख्याची राजरोसपणे छुप्या मार्गाने आयात सुरू असते. रात्रीच्या वेळी व्यवहार होतो. सीमा भागातून आलेला माल कोणत्या गोडावूनमध्ये पोचवायचा आणि ती जबाबदारी कुणाची, याची साखळी कार्यरत आहे. शहरात आणि जिल्ह्यात महामार्गावर बिनदिक्कतपणे गुटखा मिळतो. पानटपरीवर उघडपणे पुड्या लटकविल्या जात नाहीत; मात्र पुडी आहे का, अशी विचारणा केली की, ती अलगदपणे बाहेर काढून दिली जाते.