शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ९५ तक्रारी प्राप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 1:21 PM

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घेतलेल्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ९५ तक्रारी प्राप्त झाल्या.

अकोला : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेतलेल्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ९५ तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींचा पंधरा दिवसांत निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या. तक्रारींची चौकशी करून पंधरा दिवसांच्या आत तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असल्याचा दिलासाही पालकमंत्र्यांनी तक्रारकर्त्यांना दिला. मागील जनता दरबारात प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी काय कार्यवाही केली, यासंदर्भात चौकशी करून पालकमंत्र्यांनी विभागनिहाय आढावा घेतला. तसेच जनता दबारात प्राप्त विविध विभागांसंबंधी नवीन तक्रारींचा पंधरा दिवसांत निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, अभयसिंह मोहिते, रमेश पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बोंडअळीच्या मदतीपासून वंचित शेतकºयांची तक्रार!बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पीक नुकसान भरपाईपोटी मदतीच्या लाभापासून वंचित असल्याची तक्रार बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील अजित पारसकर, राजेश पारसकर यांच्यासह ४२ शेतकºयांनी जनता दरबारात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली. शेतकºयांच्या या तक्रारीचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना दिले.गावात दारूबंदी करा; पिंजर महिलांची मागणी!पिंजर वडगाव या गावात गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढल्याने, गावातील पुरुष वर्ग दारूच्या आहारी गेला आहे. त्यामुळे गावात दारूबंदी करण्याची मागणी पिंजर वडगाव येथील महिलांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली. त्यानुषंगाने यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलीस विभागाला दिल्या.

विभागनिहाय अशा प्राप्त झाल्या तक्रारी!पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी नागरिकांकडून ९५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये महसूल विभाग-२८, पोलीस विभाग-१०, जिल्हा परिषद -१२, महानगरपालिका-१४, विद्युत विभाग-८, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-२, भूमी अभिलेख विभाग-४, कृषी विभाग-२, जिल्हा अग्रणी बँक-८, वन विभाग-१, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना-२, सार्वजनिक बांधकाम विभाग-२, मत्स्य विभाग-१ व इतर १ अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

 

टॅग्स :Dr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलAkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय