शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या रुग्णांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:19 IST

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी सकाळी रुग्णालयास भेट देऊन, रुग्णांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देडॉक्टर असलेले पालकमंत्री यांनी सोमवारी सर्वोपचार रुग्णालयास भेट देऊन विविध विषयांचा आढावा घेतला.रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासोबतच त्यांना योग्य आरोग्य सेवा पुरविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क करून कामात कुचराई न करण्याबाबत त्यांची कानउघाडणी केली.

अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा, मनुष्यबळाचा अभाव आदी कारणांमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या पृष्ठभूमिवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी सकाळी रुग्णालयास भेट देऊन, रुग्णांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासोबतच त्यांना योग्य आरोग्य सेवा पुरविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.डॉक्टर असलेले पालकमंत्री यांनी सोमवारी सर्वोपचार रुग्णालयास भेट देऊन विविध विषयांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नेत्र चिकित्सा विभाग, बालरोग चिकित्सा विभाग, चर्मरोग, गुप्तरोग, कुष्ठरोग विभाग, दंतरोग चिकित्सा, बाह्यरुग्ण विभाग, मुखपूर्व कर्करोग उपचार केंद्र कान-नाक-घसा विभाग आदी विभागाला भेट दिली. तेथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.बालरोग चिकित्सा विभागात उपचारासाठी असलेल्या लहान मुलांना योग्य उपचार व औषध देण्याबाबत तिथे उपस्थित असलेल्या नर्सिंग स्टाफला डॉ. रणजित पाटील यांनी सूचना दिल्या. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यानंतर बांधकाम चालू असलेल्या श्रोतृगृह (आॅडीटोरियम) भेट देऊन त्वरित बांधकाम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम शिरसाम,वैद्यकीय उप-अधीक्षक डॉ. दिनेश नैताम, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, चंद्र्रकांत चन्ने आदी उपस्थित होते.प्रशासकीय व आरोग्य सेवेचा आढावातत्पूर्वी, डॉ. रणजित पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या कक्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय तसेच रुग्णांच्या आरोग्य सेवेबाबत आढावा घेतला. शवविच्छेदन विभागातील शीतगृह, रुग्णालयात निर्माण होणाºया जैव कचºयाची विल्हेवाट आदी विषयांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांबाबतची माहिती घेतली. पॅथॉलॉजी, रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभाग, विविध शस्त्रक्रिया, रक्तपेढी, अतिदक्षता विभाग, एमआरआय, औषधांचा साठा, रुग्णवाहिका आदींची सूक्ष्म माहिती डॉ. पाटील यांनी घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.विद्युतविषयक कामे मार्गी लावण्याच्या सूचनासार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाºया विद्युत विभागातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्युतविषयक कामांत दिरंगाई होत असल्याची तक्रार अधिष्ठाता राजेश कार्यकर्ते यांनी केली. यावेळी पालकमंत्री यांनी त्वरित दूरध्वनीवरून संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क करून कामात कुचराई न करण्याबाबत त्यांची कानउघाडणी केली. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील