शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ने रोखली बांधकाम विभागाची कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:33 IST

अकोला : ‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विविध १५0 विकास कामांच्या अंदाजपत्रकांना सुधारित करण्यासाठी परत करण्यात आली आहेत. या कामांसाठी जवळपास दोन ते तीन कोटी रुपये खर्च होणार आहेत. 

ठळक मुद्दे१५0 विकास कामांना बसला फटका! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विविध १५0 विकास कामांच्या अंदाजपत्रकांना सुधारित करण्यासाठी परत करण्यात आली आहेत. या कामांसाठी जवळपास दोन ते तीन कोटी रुपये खर्च होणार आहेत. दहा दिवसांपूर्वीच्या जारी केलेल्या परिपत्रकानुसार नवी जिल्हा दरसूची (डीएसआर) जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध साहित्यांचा दर हा ‘जीएसटी’सह लागू होण्यापूर्वीच्या दरापेक्षा कमी असल्यामुळे त्या कामांची अंदाजपत्रके नव्याने करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर आली. त्यासाठी आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायतींकडून प्राप्त कामांच्या अंदाजपत्रकीय रकमेमध्ये बदल करावा लागत आहे. जिल्हय़ात १५0 कामांचे अंदाजपत्रक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना परत करण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून दोन ते तीन कोटींची कामे ठप्प आहेत.दरम्यान, काही कंत्राटदारांनी अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा कमी दराने (बिले) कामे स्वीकारलेली आहेत. त्यात आणखी दर कमी केल्यास त्यांचाही वांधा होणार आहे. या वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीमुळे कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणीत भर पडल्याने ते बिथरले आहेत.  जुलैमध्ये जीएसटी लागू झाला. तत्पूर्वीच एक जुलैच्या अगोदर सिंचन, बांधकाम, पाणी पुरवठा व अन्य विभागांच्या निविदा जाहीर झाल्या होत्या. त्यांचे अंदाजपत्रक हे २0१३-१४ च्या ‘डीएसआर’नुसार तयार करण्यात आले होते. त्याच काळात जीएसटी लागू झाल्यामुळे ही कामे जुन्या दराने करायची की नवीन करप्रणालीनुसार करायची, असा पेच निर्माण झाला. त्यावर आता नवीन अंदाजपत्रक तयार करून तोडगा काढण्यात आला आहे. जीएसटी आणि डीएसआरनुसार होणारे फेरबदल करून नव्याने अंदाजपत्रक सादर केले जात आहेत. त्यापैकी काही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. 

टॅग्स :GSTजीएसटी