शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी पोर्टलचे सर्व्हर डाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:33 IST

अकोला : वस्तू व सेवा कर याच्या ऑनलाइन (जीएसटी) पोर्टलचे सर्व्हर कायम डाउन राहत असल्याने अकोल्यातील कर सल्लागार, उद्योजकांना रिटर्न फाइल करणे कठीण झाले आहे. जीएसटी अधिकार्‍यांकडे कोणतेही उत्तर नसल्याने त्यांनी थेट परिषदेकडे बोट दाखवून सुटका केली आहे. रिटर्न फाइल करण्याचे लाभ जर मिळाले नाही, अन् जीएसटीच्या कारवाईच्या कचाट्यात उद्योजक अडकले तर काय होईल, या कोंडीत आता कर सल्लागार सापडले आहे.

ठळक मुद्देअधिकार्‍यांचे परिषदेकडे बोटरिटर्न फाइल न झाल्याने कर सल्लागारांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वस्तू व सेवा कर याच्या ऑनलाइन (जीएसटी) पोर्टलचे सर्व्हर कायम डाउन राहत असल्याने अकोल्यातील कर सल्लागार, उद्योजकांना रिटर्न फाइल करणे कठीण झाले आहे. जीएसटी अधिकार्‍यांकडे कोणतेही उत्तर नसल्याने त्यांनी थेट परिषदेकडे बोट दाखवून सुटका केली आहे. रिटर्न फाइल करण्याचे लाभ जर मिळाले नाही, अन् जीएसटीच्या कारवाईच्या कचाट्यात उद्योजक अडकले तर काय होईल, या कोंडीत आता कर सल्लागार सापडले आहे.जीएसटी रिटर्न भरण्यासाठी ऑनलाइनवर एकच गर्दी झाल्याने पोर्टलच्या सर्व्हरची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे अनेकांचे रिटर्न फाइल होणेच बंद झाले आहे. २५ आणि २८ ऑगस्टच्या तारखेला असलेला भरणाही आता वांध्यात सापडला आहे. ऑनलाइनवर रिटर्न फाइल करण्यासाठी उद्योजक आणि कर सल्लागारांची चांगलीच धावपळ सुरू आहे. सर्व्हर डाउन राहत असल्याने अनेकांच्या हातून जीएसटीच्या नियोजित तारखा निसटल्या आहेत. कंपोझिशन स्कीमची १६ ऑगस्टची तारीख अशीच हातातून गेली असून, ती वाढवून मिळावी म्हणून परिषदेकडे तक्रारी पोहोचल्या आहेत. सर्व्हर डाउनच्या तक्रारीमुळे ठरावीक तारखांच्या आत रिटर्न भरले गेले नाहीत. तांत्रिक अडचणीत सापडलेल्या या उद्योजक आणि कर सल्लागारांना दिलासा देण्यासाठी परिषदेने पाऊल उचलण्याची गरज आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत काळजी करण्याचे काम नाही, असे जीएसटी अधिकार्‍यांकडून म्हटले जात असले, तरी यादरम्यानचे सर्व ‘बेनिफिट’ गमाविले जाऊ नये म्हणून रिटर्नचा भरणा कर सल्लागारांच्या म्हणण्याने केला जात आहे; पण त्यांच्या पदरी निराशा येत आहे. यासोबतच जीएसटीचे नवीन रजिस्ट्रेशनही होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. जीएसटीची अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाली असली, तरी अनेक समस्यांवर अजूनही उपाययोजना झाल्या नसल्याने रिटर्न फाइल करणार्‍या व्यापारी आणि कर सल्लागारांची कोंडी झाली आहे. सर्व्हर डाउनच्या तक्रारींसोबत उद्योजकांसमोर येणार्‍या तक्रारींचे निराकरण करणारी तज्ज्ञ मंडळी अजून तरी जीएसटीकडे नाही. त्यामुळे जीएसटीच्या अधिकार्‍यांनी थेट परिषदेकडे बोट दाखविले आहे. परिषदेने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.