शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी पोर्टलमध्ये पुन्हा बिघाड; भुर्दंड मात्र करदात्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 15:21 IST

अकोला : जीएसटी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील हजारो करदात्यांना जीएसटीआर थ्रीबी फाइल करता आले नाही.

- संजय खांडेकरअकोला : जीएसटी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील हजारो करदात्यांना जीएसटीआर थ्रीबी फाइल करता आले नाही. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही समस्या निर्माण होत असल्याने त्याचा भुर्दंड मात्र हजारो उद्योजकांना सोसावा लागतो आहे. गेल्या २१ महिन्यांपासून सुरू असलेल्या या तांत्रिक लुटीमुळे उद्योजक आणि कर सल्लागार कमालीचे त्रासले असून, त्यांनी जीएसटी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर आणि जीएसटी पोर्टलवर यासंदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत.वास्तविक पाहता जीएसटीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड असताना ‘लेट फी’ची कारवाई होऊ नये; मात्र इंटरेस्ट पेनल्टी , लेट फी मात्र उद्योजकांवर लावली जाते. मागील अनुभव लक्षात घेता, प्रत्येक महिन्याच्या ९, १०, १९, २० हे चार दिवस जीएसटीची साइट जवळ-जवळ जाम असते. कधी सर्व्हर डाउन तर कधी एरर आलेला असतो. दरम्यान, २० तारखेपर्यंत तीन रविवार होऊन गेलेले असतात. त्यात ५ तारखेपर्यंत कोणत्याही उद्योजकाचा परचेस सेल अकाउंट पूर्ण झालेला नसतो. त्यामुळे ठरवून दिलेल्या २० तारखेला जीएसटीआर थ्रीबी फाइल करणे अशक्य होते. शेवटच्या चरणात फाइलिंगची प्रक्रिया पूर्ण होत नाही. गेल्या २१ महिन्यांपासून हीच स्थिती सुरू आहे; मात्र जीएसटी पोर्टल क्षमतेत कोणतीही सुधारणा दिसत नाही. स्वत:ची क्षमता सक्षम नसताना उद्योजकांवर आईपीएल लावणे कितपत बरोबर आहे. ही लूट थांबविण्यात यावी म्हणून जीएसटी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अनेक सनदी लेखापाल, कर सल्लागार आणि विधिज्ञांनी अनेक तक्रारी नोंदविल्या आहेत. जीएसटी पोर्टलवर याआधीच अनेकदा यावर ऊहापोह झाला; मात्र समस्या काही केल्याने अद्याप संपुष्टात आलेली नाही.-जीएसटीची आॅनलाइन फाइलिंग सिस्टीम ही मुख्य सर्व्हरशी जोडलेली आहे. यामध्ये आम्हाला काहीही करता येत नाही. तक्रारीसंदर्भातील आढावा वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.-डॉ. अनिल करडेकर, कर उपायुक्त, जीएसटी कार्यालय अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी