शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’; सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:00 IST

अकोला : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलैपासून केंद्र सरकारने केली. पुरेसा अभ्यास न करता अंमलबजावणीची घाई झाल्याने जीएसटीचे दुष्परिणाम समोर येत आहेत. एकाच करात सर्व करांचा गुंता सुटेल, ही आशा व्यापारी-उद्योजक आणि सरकारला होती; मात्र जीएसटी भरणाच्या तारखांमुळे आणि दररोज ठेवाव्या लागत असलेल्या नोंदीमुळे प्रामाणिक करदाते आणि कर सल्लागार कमालीचे वैतागले आहेत.

ठळक मुद्देनोंदणी आणि ऑनलाइन भरणाने वैतागले व्यापारी

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलैपासून केंद्र सरकारने केली. पुरेसा अभ्यास न करता अंमलबजावणीची घाई झाल्याने जीएसटीचे दुष्परिणाम समोर येत आहेत. एकाच करात सर्व करांचा गुंता सुटेल, ही आशा व्यापारी-उद्योजक आणि सरकारला होती; मात्र जीएसटी भरणाच्या तारखांमुळे आणि दररोज ठेवाव्या लागत असलेल्या नोंदीमुळे प्रामाणिक करदाते आणि कर सल्लागार कमालीचे वैतागले आहेत. उलटपक्षी अजूनही चोरीच्या घटनांवर सरकारला प्रतिबंध लावता आलेला नाही. त्यामुळे जीएसटीचे दुखणे सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही, असे झाले आहे.जीएसटीच्या अंमलबजावणीआधी जीएसटी परिषदेने अनेकदा बैठका घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांपासून तर कनिष्ठ अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले. मोठा गाजावाजा करून जीएसटीचे स्वागत करण्यात आले. जीएसटीमुळे करदात्यांचा सन्मान आणि चोरांवर अंकु श लागेल, अशी आशा होती; मात्र जीएसटी अंमलबजावणी नोटाबंदीसारखीच फसली. ५ ते २८ टक्के जीएसटी कर लादल्यानंतर जीएसटी परिषदेने अनेक बदल केलेत. काही वस्तूंवरील कर कायमचा बाद केला, तर काही वस्तूंवरील कर कमी केला. हे बदल बाजारपेठेतून आलेल्या विपरीत परिणामानंतर झाले. अनेक विपरीत परिणाम अजूनही सुरूच आहेत. जीएसटी परिषदेने लादलेल्या २८ टक्के कराला अनेकजण कंटाळले आहेत. अतिरिक्त लादलेला कर त्यात भरणाच्या विविध तारखा आणि रोजनिशी नोंदी, सर्व्हर डाउन, सीए आणि जीएसटी अधिकार्‍यांनाच न समजणारी स्थिती यामुळे गोंधळ झाला आहे. देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याशी जेव्हा अकोल्यातील सनदी लेखापालांनी संवाद साधला, तेव्हा जीएसटी अजूनही कुणाला कळलेला नाही, याची जाणीव झाली. कर भरणा आणि आणि खात्यात जमा होणारी क्रेडिट याबाबत अजूनही सुस्पष्टता नाही. ही साखळी जुळविण्यात अनेकांचे श्रम वाया जात आहेत. ही साखळी जुळविण्याऐवजी नाममात्र बिलांवर जीएसटी क्रमांक नोंदवून, कुठेही ऑनलाइन व्यवहार न दाखविता अप्रामाणिक व्यापार्‍यांनी चोरी सुरू केली आहे. त्यांच्यावर कारवाई नाही. उत्पादन शुल्क, जकात, जीएसटी अधिकार्‍यांच्या डोळ्यात धूळ झोकून दररोज कोट्यवधींची वरकमाई सुरू आहेत. त्यावर कुणाचेही निर्बंध नाही. उलटपक्षी जे प्रामाणिक कराचा भरणा करीत आहेत, त्यांच्यामागे डोकेदुखी आणि दंडात्मक कारवाया सुरू होणार आहेत. जीएसटीच्या घाईघाईत केलेल्या अंमलबजावणीने प्रामाणिक करदाते दुखावले गेले, व्यापार संपला आणि चोरीचे प्रमाणदेखील वाढले आहेत.

टॅग्स :GSTजीएसटी