शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’तून सरकी-ढेप वगळली!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:41 IST

अकोला :  सरकी-ढेपवर लावलेला पाच टक्के जीएसटी सरसकट माफ केल्याने देशभरात सरकी-ढेपचा कोट्यवधींचा पुरवठा करणार्‍या अकोल्यातील  उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. सोबतच या निर्णयामुळे कास्तकार आणि पशुपालक सुखावला आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत तेजी येणार!रकी-ढेपवर लावलेला पाच टक्के जीएसटी सरसकट माफ

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  सरकी-ढेपवर लावलेला पाच टक्के जीएसटी सरसकट माफ केल्याने देशभरात सरकी-ढेपचा कोट्यवधींचा पुरवठा करणार्‍या अकोल्यातील  उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. सोबतच या निर्णयामुळे कास्तकार आणि पशुपालक सुखावला आहे. ९ सप्टेंबरच्या जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे    सरकी-ढेप बाजारपेठेत तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. जुलैपासून लागू झालेल्या जीएसटी कायद्यात शेतमाल, पशुखाद्यास करमुक्त केले; मात्र सरकी-ढेपवरील करासंदर्भात शासनाने स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. सरकी-ढेपचा वापर कारखानदार करीत असल्याचे बोलले जात असल्याने, सरकी-ढेपवर पाच टक्के जीएसटी लावला गेला होता. शासनाच्या या निर्णयामुळे उद्योजक आणि पशुपालकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे विदर्भ आणि खंडवा परिसरातील ढेप उद्योग संकटात सापडला होता. याबाबत अनेक तक्रारी जीएसटी पोर्टलवर नोंदविल्या गेल्यात. अनेक निवेदने शासनापर्यंत पोहोचलेत. दरम्यान, हैदराबाद येथे झालेल्या जीएसटीच्या परिषदेत अनेक करप्रणालीत बदल केला गेला. या बदलात सरकी-ढेपला जीएसटीतून पूर्णपणे मुक्त करण्यात आले आहे. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या या निर्णयाचे अकोल्यातील उद्योजकांनी स्वागत केले आहे.कापसाचा पेरा विदर्भात मोठय़ा प्रमाणात असल्याने कापूस आणि त्यापासून निघणार्‍या वेस्टेजवर प्रक्रिया करणारे उद्योग जास्त आहेत. त्यातूनच अकोल्यात ढेपची मोठी बाजारपेठ उभारली आहे. अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीत जवळपास १५ उद्योग सरकी-ढेपचे असून, देशातील कानाकोपर्‍यात येथील सरकी-ढेप प्रसिद्ध आहे. दुधाळ जनावरांच्या दुधाच्या प्रमाणात वृद्धी होत असल्याने पशुपालकांकडून सरकी-ढेपला कायम मागणी असते. कधीकाळी अकोल्यात सरकी-ढेपचे ४५ उद्योग होते; मात्र डब्बा ट्रेडिंगमुळे आणि शासनाच्या धोरणामुळे अकोल्यातील ३0 उद्योग डबघाईस आले. त्यातूनच ढेपचे भाव घसरले. जानेवारी २0१७ मध्ये ढेपचे भाव २३00 रुपये प्रतिक्विंटल होते. हे भाव सातत्याने घसरत आठ महिन्यांत अध्र्यावर आले आहेत. १४५0 प्रतिक्विंटल ढेपचे भाव आज बाजारपेठेत आहेत. 

बाजारपेठेत तेजी येणार!एकीकडे ढेपचे भाव घसरले तर दुसरीकडे शासनाचे  जीएसटी धोरण आडवे येत होते; मात्र आता सरकी-ढेप उद्योग जीएसटीतून मुक्त झाल्याने बाजारपेठेत पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.