शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

‘जीएसटी’त व्यापाऱ्यांना स्वयंप्रमाणपत्र परवान्याची मुभा! -  डॉ. अनिल करडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 12:08 IST

अकोला : देशभरातील व्यापारी आणि उद्योजकांना स्वयंप्रमाणपत्राद्वारे परवाना देण्याची मुभा ‘जीएसटी’त आहे. उत्पन्न, आवक, जावक आणि नफ्याचे मूल्यमापन करीत स्वनिश्चित कर भरण्याची सुविधा जीएसटीने मिळवून दिली आहे, असे मत अकोला वस्तू आणि सेवाकर विभागाचे उपायुक्त डॉ. अनिल करडेकर यांनी व्यक्त केले.

- संजय खांडेकरअकोला : देशभरातील व्यापारी आणि उद्योजकांना स्वयंप्रमाणपत्राद्वारे परवाना देण्याची मुभा ‘जीएसटी’त आहे. उत्पन्न, आवक, जावक आणि नफ्याचे मूल्यमापन करीत स्वनिश्चित कर भरण्याची सुविधा जीएसटीने मिळवून दिली आहे, असे मत अकोला वस्तू आणि सेवाकर विभागाचे उपायुक्त डॉ. अनिल करडेकर यांनी व्यक्त केले. जीएसटी, ई वे-बिलिंग, व्यवसायकर संदर्भातील समज-गैरसमजाबाबत डॉ. करडेकर यांनी ‘लोकमत’ला दिलेली विशेष मुलाखत.प्रश्न : ‘जीएसटी’चा कायदा कठोर झाल्यास काय होऊ शकते?उत्तर : ‘जीएसटी’चा कायदा सध्या मवाळ आणि स्वयंप्रमाणित आहे, तरीही महाराष्ट्र अव्वल आहे. व्हॅटचा भरणा करणाºयांची संख्या नऊ लाख होती. जीएसटीत ही संख्या वाढून १३ लाख झाली आहे. जर ‘जीएसटी’चा कायदा कठोर करण्यात आला तर करदात्यांची संख्या आणि कर वाढणार आहे. भविष्यात ‘जीएसटी’चा कायदा कठोर होईल. साधे फलकदेखील कुणी अद्याप लावलेले नाही. सध्यातरी कायदा मवाळ आहे.प्रश्न : ‘जीएसटी’ कर उपायुक्त म्हणून काय अडचणी जाणवतात?उत्तर : ‘जीएसटी’ कर उपायुक्त म्हणून मी विभागात प्रमुख असलो तरी भर भरणा कार्यपद्धती संपूर्णपणे आॅनलाइन झाली आहे. तांत्रिक बिघाड, एरर, यावेळी मी हतबल असतो. केवळ वरिष्ठांकडे पोर्टलवर कळविण्याशिवाय काही करता येत नाही. जीएसटीची पुनर्रचना प्रस्तावित आहे. त्यात सुधारणा झाल्यानंतर बºयाच अडचणी सोडविता येतील; मात्र तांत्रिक अडचणींना पर्याय नाही. तो विषय माझ्या अख्यारीतील नाही.प्रश्न : ‘कम्पोजिशन स्कीम’चा फायदा नेमका कुणाला होतो?उत्तर : ‘कम्पोजिशन स्कीम’ची मर्यादा २० लाखांवरून ४० लाखांवर गेली तरी कर भरणाºयांची संख्या कमी होऊ शकत नाही. ज्यांना व्यवसाय साखळी पूर्ण करायची असेल, त्यांना जीएसटी क्रमांक नाइलाजास्तव मिळवावा लागतो. तशी यंत्रणा जीएसटीने केली आहे. ‘कम्पोजिशन स्कीम’मध्ये सहभागी होणाºयांना आपला ठरावीक कर दाखवावा लागतो; मात्र तो ग्राहकांवर जीएसटी आकारू शकत नाही. त्यात ग्राहकांचा फायदा आहे.प्रश्न : व्यवसायकर प्रणालीबाबत संभ्रम कसा दूर करता येईल?उत्तर : व्यवसायकर भरणाºयांची संख्या अजूनही राज्यात अपेक्षित तेवढी नाही. याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. राज्याच्या ग्रामविकास खात्यात ही रक्कम गोळा होते आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसारख्या लोकाभिमुख प्रकल्पासाठी हा निधी वापरला जातो. केवळ राज्यातील अधिकारी-कर्मचारी, कामगारांच्या वेतनातून व्यवसाय कर कापला जातो. केंद्राचे अधिकारी-कर्मचारी यांनाही महाराष्ट्रात हा कर सक्तीचा आहे. यावरून अनेकदा संभ्रम निर्माण होतो.प्रश्न : ई वे-बिलिंगची तपासणी दिसून येत नाही, कारण काय?उत्तर : ई वे-बिलिंगच्या कार्यपद्धतीचे टप्पे अजून सुरू आहेत. ई वे-बिलिंगची सूची आणि त्याची तपासणी मुंबईहून नियमित होत असते. भविष्यात दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतरच ई वे-बिलिंगची तपासणी समोर येईल. भविष्यात उपग्रहावरूनही देखरेख करण्याचा संकल्प जीएसटी परिषदेचा आहे. अनेक बाबी कार्यालयांतर्गत असल्याने त्या दिसून येत नाहीत.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी