शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत मोठी घट; ओलिताची शेती होतेय कोरडवाहू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 15:23 IST

घटती भूजल पातळी, वारेमाप वृक्षतोड या सर्वांचा परिणाम जमिनीवर होऊन ओलिताचे पीक फळबागा सिंचन शेतकऱ्यांना कठीण होत आहे.

- सत्यशील सावरकर लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : दरवर्षी होत असलेले कमी पर्जन्य, हवामानातील ओझोन व प्रखर उष्णतेने पाण्याच्या नैसर्गिक स्रोताचे विघटन, घटती भूजल पातळी, वारेमाप वृक्षतोड या सर्वांचा परिणाम जमिनीवर होऊन ओलिताचे पीक फळबागा सिंचन शेतकऱ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे ओलिताखालील जमीन निम्म्यावर येऊन जमिनीचा पोत बंजर होत असल्याचे विदारक चित्र ड्रायझोनची चाहूल देत आहे.तालुका भौगोलिकदृष्ट्या चार भागात असून, कळासपट्टी सातपुडा पायथा, मध्यभाग, खारपाणपट्टा, दक्षिणेस नदी पठार भागात व्यापला आहे. यामध्ये लागवडीखालील ६५ हजार १२९ हे.आर., लागवडीलायक ५५ हजार ९११ हे.आर. जमीन आहे. यामध्ये ओलिताची व कोरडवाहू जमीन येते. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिकासाठी सुपिक असलेला हा तालुका वान लाभ क्षेत्रातील ओलीत व सिंचन विहीर, कूपनलिकाद्वारे ओलिताखाली होता. आजही वान हनुमान सागर धरण लाभ क्षेत्रात २५हजार २८ हे.आर. पैकी १९ हजार १७७ हे.आर. सिंचन अपेक्षित असते, हे पाणी रब्बी पिकाला मिळते. उर्वरित शेतजमिनीवर कळासपट्टी व मध्यभागात जास्त सिंचन होऊन फळबाग लागवड करण्यात येते. खारपाणपट्टा व दक्षिण भागात सिंचन कमी होते. तालुक्यातील ओलिताखालील जमीन ही कूपनलिकाद्वारे सिंचनाखाली आहे; परंतु दिवसेंदिवस पाण्याची भूजल पातळी तळाला जात आहे. आज रोजी कळासपट्टी व मध्यभागातील पातळी तीनशे फुटाच्यावर गेली असल्याने या भागातील उभ्या केळी, संत्रा झाडे, पान पिंपरी, भाजीपाला पिके धोक्यात आले आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी उभ्या बागा पाण्यामुळे तोडल्या आहेत. याच भागातील सातपुडा पर्वतरांगेतून तालुक्यातील नदीनाल्याचा उगम आहे; परंतु मुख्य नदी पूर्णा, आस, विदु्रपा, पोहरा, गौतमा या कमी पावसाने बंजर होत असल्याचे चित्र आहे. या नद्यांसह नाले पावसाळ्यातच कोरडे पडतात. त्यामुळे परिसरात ‘पाणी अडवा, जिरवा’ न होत असल्याने भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. तालुक्यातील चारही बाजूंनी पाणी पातळीने तळ गाठला असल्याने ओलिताखालील क्षेत्रात घट होऊन जमीन कोरडवाहू होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराagricultureशेती