शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भाऊबिजनिमित्त सुबोध सावजींची २०० बहिणींना ओवाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 18:58 IST

   २०० महिलांना साडी,पातळ आणि ब्लँकेट वितरण करण्यात आले.

 अकोला : शांती,अहिंसा आणि स्वातंत्र्य चळवळीचे महत्वाचे स्थान असलेल्या या भूमित भाऊबीज ओवाळणी देतांना मला अतीव आनंद होत आहे. ही भेट आपण सर्व भगिनींनी आनंदाने स्विकारून मला आशीर्वाद द्यावा असे बुलढाण्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी संबोधित करताना म्हटले.      सेवाग्राम येथील नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये भाऊबीज ओवाळणी कार्यक्रमाचे आयोजन मुंबा देवी मंदिर देवस्थान मुंबई च्या व्यवस्थापण समितीच्या वतीने आणि माजी आमदार सुबोध सावजी यांच्या पुढाकाराने मंगळवारला घेण्यात आला.या प्रसंगी नयी तालिमचे डॉ. शिवचरण ठाकुर,गिरीश काशीकर, विठ्ठल तपासे,नामदेव ढोले,शोभा कवाडकर उपस्थित होते.मान्यवरांनी बापू,माँ - बाबा यांच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण करण्यात आली.       सुबोध सावजी म्हणाले हा ऐकोनविसावा भाऊबीज चा कार्यक्रम आहे. मी दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला भगिनींना भेटवस्तू देत असतो.लोकांना दोन तीन बहिणी असतात पण मी भाग्यवान आहे या ठिकाणी दोनशे बहिणींना मी भाऊबीजेची ओवाळणी देणार आहे. या भेटीत साडी आणि ब्लँकेट असल्याचे सांगून हे सर्व मुंबईतील प्रसिद्ध मुंबा देविच्या चरणी अर्पण केलेल्या साड्या असल्याचे त्यांनी सांगितले.      मी हे सर्व आपल्या आशीर्वादासाठी करीत असून अठरा कार्यक्रम आदीवासी आणि दुर्गम भागात केलेले आहे. यातून मला आनंद मिळतो हे या ठिकाणी प्रांजळपणे कबूल करतो.       २०० महिलांना साडी,पातळ आणि ब्लँकेट वितरण करण्यात आले.यासाठी आश्रमचे मिथून हरडे, विजय धुमाळे,रूपाली ऊगले,नयी तालिम चे रूपेश कडू यांनी सहकार्य केले.

टॅग्स :AkolaअकोलाSubodh Savjiसुबोध सावजी