शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

‘ग्रीन झोन’च्या कामांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:18 IST

सदर कामांची आता तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ‘ग्रीन झोन’(हरित पट्टे)मधील वृक्ष लागवडीसह इतर मूलभूत सुविधांसाठी २०१५ मध्ये नागरी स्वायत्त संस्थांना कोट्यवधींचा निधी देण्यात आला. ग्रीन झोनच्या कामांची तपासणी करण्यासाठी शासन स्तरावरून त्रयस्थ यंत्रणेची नेमणूक करण्यात आली होती. सदर कामांची आता तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या निकषामध्ये समावेश होऊ न शकलेल्या राज्यातील इतर शहरांना ‘अमृत’योजनेत समाविष्ट करण्यात आले. अमृत योजनेंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना तसेच खुल्या जागांवर हरित पट्टे (ग्रीन झोन) निर्माण करण्याचा समावेश आहे. भुयारी गटारच्या माध्यमातून शहरातील घाण सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा वापर शेती किंवा उद्योगासाठी करता येईल. पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहराच्या पाणी पुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे निर्देश आहेत. या योजनेसाठी केंद्र शासनाने राज्यातील नागरी स्वायत्त संस्थांना कोट्यवधींचा निधी दिला आहे. प्राप्त निधीतून होणारी कामे नियमानुसार होत आहेत किंवा नाही, याची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाने त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून तांत्रिक लेखापरिक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शाह कन्सलटन्सीची नियुक्ती करण्यात आली होती.एजन्सीचा अहवाल गोपनीय का?‘ग्रीन झोन’मधील वृक्ष लागवडीसह इतर कामांची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ यंत्रणेने यापूर्वीही अनेकदा तपासणी केल्याची माहिती आहे; परंतु तपासणीचा अहवाल गोपनीय ठेवण्यामागे उद्देश काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. ही बाब लक्षात घेता पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या स्तरावर घेण्यात आला आहे.

टॅग्स :Akolaअकोला