शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पात्र शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:43 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’  करण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले  आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी १ लाख ९१ हजार  १३१ शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू  करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार शेतकर्‍यांचा समावेशप्रमाणपत्र दिलेल्या ५६ शेतकर्‍यांना आज मिळणार प्रत्यक्ष कर्जमाफी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’  करण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले  आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी १ लाख ९१ हजार  १३१ शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू  करण्यात आली आहे. सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार  शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रु पयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित पर तफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर  अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना  विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ा तील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज  शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम  २२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले. ऑनलाइन भरलेल्या  अर्जांच्या पडताळणीत जिल्ह्यात १ लाख ९१ हजार १८७ शे तकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत  बँकांच्या थकबाकीदार शेतकर्‍यांचा समावेश आहे.  कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी ५६ शेतकर्‍यांना  १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले.  जिल्ह्यातील उर्वरित कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ९१  हजार १३१ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू  करण्यात आली आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या  ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचे काम  शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहे. 

प्रमाणपत्र दिलेल्या ५६ शेतकर्‍यांना आज मिळणार प्रत्यक्ष  कर्जमाफी!कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र  ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी ५६ शेतकर्‍यांना गत १८ ऑक्टोबरला  कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. कर्जमाफीचे प्रमाणपत्र  दिलेल्या या शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात मंगळवार, २४ ऑ क्टोबर रोजी कर्जाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे  संबंधित ५६ शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मंगळवारी  मिळणार आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि  राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार खातेदार शेतकर्‍यांचा  समावेश आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्या तील शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच  कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या ५६ शेतकर्‍यांच्या कर्ज  खात्यात २४ ऑक्टोबरला कर्जाची रक्कम जमा करून  कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.-जी.जी. मावळेजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :agricultureशेती