शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
4
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
5
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
6
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
7
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
8
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
9
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
10
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
11
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
12
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
13
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
14
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
15
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
16
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
17
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
18
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
19
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

महान येथे जलवाहिनीची संतप्त नागरिकांकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:43 AM

महान: स्थानिक ग्रामपंचायतकडे नळ योजनेच्या विद्युत  बिलादाखल ६ लाख ५३ हजार २४0 रुपयांची रक्कम थकीत  असल्याने, नळ योजनेचा वीज प्रवाह दीड महिन्यापूर्वी  वीज कं पनीने खंडित केला होता. तेव्हापासून महानमधील वॉर्ड क्रमांक  ३, ४ व ५ मधील नागरिकांना पाणीपुरवठा बंद आहे. 

ठळक मुद्देतीन वॉर्डातील नागरिक दीड महिन्यांपासून पाण्याविना वीज कंपनीने नळ योजनेचा वीज प्रवाह केला होता खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कमहान: स्थानिक ग्रामपंचायतकडे नळ योजनेच्या विद्युत  बिलादाखल ६ लाख ५३ हजार २४0 रुपयांची रक्कम थकीत  असल्याने, नळ योजनेचा वीज प्रवाह दीड महिन्यापूर्वी  वीज कं पनीने खंडित केला होता. तेव्हापासून महानमधील वॉर्ड क्रमांक  ३, ४ व ५ मधील नागरिकांना पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी २२ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजता  महाजल योजनेच्या विहिरीवरील जलवाहिनीवरील व एअर  व्हॉल्व्हची तोडफोड केली. जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने महाजल योजनेंतर्गत  महान येथे १ कोटी ८0 लाख रुपये खचरून पाणीपुरवठा योजना  साकारण्यात आली आहे; परंतु या योजनेतील विहिरीचे हस्तां तरण ग्रामपंचायतला करण्यात आले  नाही. दरम्यान, नळ  योजनेच्या विद्युत बिलादाखल ६ लाख ५३ हजार २४0 रुपयांची  रक्कम थकीत असल्याने  महावितरणने नळयोजनेचा वीज प्रवाह  दीड महिन्यांपूर्वी खंडित केला. ग्रामपंचायत प्रशासनाने इंजिनिअर  चव्हाण यांना महाजलच्या विहिरीमधून पाणी घेण्याची तोंडी संम ती मिळवून दिली. गेल्या दीड महिन्यांपासून त्या विहिरीमधील पाणी ग्रामपंचायत  प्रशासन घेत आहे. महान ग्रामपंचायत प्रशासनाने वॉर्ड कॅ. १ व  वॉर्ड क्रमांक २ मधील बिहाडमाथा, चिंचखेड झोपडपट्टीमधील  नागरिकांना पिण्यास पाणीपुरवठा केला; परंतु वॉर्ड क्रमांक ३, ४  व ५ मधील नागरिकांना या पाण्याचे वाटप केले नाही. त्यामुळे  मागील दीड महिन्यांपासून पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या  महानमधील तीन वॉर्डामधील नागरिकांनी त्यांना पाणी मिळत  नसेल, तर ते कोणालाच मिळून देणार नाही, अशी भूमिका घेऊन  २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता महाजल योजनेच्या  विहिरीवरील जल वाहिनी व एअर व्हॉल्व्हची तोडफोड केली.  यावेळी ग्रामपंचायतच सरपंच, उपसरपंच, एकही अधिकारी वा  कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. 

पाणी कर वसुलीत ग्रामपंचायत पिछाडीवरमहान ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक १ ते ५ मध्ये एकूण ५५0  नळजोडणीधारक असून, त्यांच्याकडे मार्च २0१७ पर्यंत एकूण  १२ लाख २३ हजार ८९५ रुपयांचा पाणीकर थकीत आहे. नळ  योजनेचे वीज प्रवाह खंडित होऊन दीड महिना झाले. या दीड  महिन्यांत ग्रामपंचायत प्रशासनाने एकूण ७ हजार २३0 रुपयांचा  पाणी कर वसूल केल्याने महान ग्रामपंचायत पाणी कर वसुलीत  पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. अशीच पाणी करवसुली सुरू  असली, तर किती वर्षानंतर महानवासीयांना पिण्यास पाणी  मिळणार?

आठवड्यातून दोन वेळा वसुलीग्रामपंचायतचे कर्मचारी पाणी करवसुलीकरिता आठवड्यातून  दोन वेळा घरोघरी जातात; परंतु त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळ त नसल्याचे संबंधित कर्मचार्‍यांनी सांगितले.

पाणी कर खात्यात पैसे नाहीत. त्यामुळे २000 रुपयांच्यावर   पाणी कर थकीत असणार्‍या नळजोडणीधारक खातेदारांना  नोटीस देऊन त्याबाबत दवंडीही देण्यात आली आहे.२१ महल भागातील ७0 टक्के पाणी कराची वसुली झालेली  आहे. वॉर्ड क्र. २ मधील बिहाडमाथा व चिंचखेड झोपडपट्टीत  नवीन नळ जोडण्या दिलेल्या आहेत.  महाजल योजनेच्या  विहिरीमधून पाणी घेण्यास इंजिनिअर चव्हाण यांची तोंडी संमती  घेऊन, वॉर्ड क्र. १ व २ मधील २१ महल, बिहाडमाथा व  चिंचखेड झोपडपट्टीत गेल्या दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा  केला जात आहे.- यास्मीन मो. इरफान, सरपंच, महान.

टॅग्स :Waterपाणी