शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपात शेतकऱ्यांची थट्टा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 12:58 IST

अकोला : अनुदानावरील बियाणे वाटप योजनेंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांना केवळ २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग वाटप करण्यात येत आहे.

- संतोष येलकरअकोला : अनुदानावरील बियाणे वाटप योजनेंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांना केवळ २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग वाटप करण्यात येत आहे. २० किलो बियाण्यात एक एकरही पेरणी होत नसल्याने, अनुदानावर मिळणारे अपुरे हरभरा बियाणे शेतकºयांची थट्टा करणारे ठरत आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या अनुदानावरील बियाणे वाटप योजनेत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांना ‘महाबीज’चे बियाणे वाटप करण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून ‘परमिट’ घेतलेल्या शेतकºयांना संबंधित कृषी सेवा केंद्रांमार्फत ८४० रुपयांमध्ये २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग वाटप करण्यात येत आहे. हरभरा पेरणीसाठी एकरी ३५ ते ४० किलो बियाणे लागते; परंतु अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपात शेतकºयांना सरसकट केवळ २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग दिली जात आहे. अनुदानावर मिळणाºया या २० किलो हरभरा बियाण्यात एक एकरही पेरणी होत नाही. त्यामुळे अनुदानावर मिळणारे अपुरे हरभरा बियाणे शेतकºयांची थट्टा करणारे ठरत आहे.जादा दराने बियाणे घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ!अनुदानावर मिळणाºया २० किलो हरभरा बियाण्यात एकरभरही पेरणी होत नाही. त्यामुळे पेरणीसाठी बाजारात जादा दराने हरभरा बियाणे विकत घेण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.हरभरा बियाण्याचे असे आहेत दर!अनुदानावर बियाणे वाटप योजनेंतर्गत प्रतिकिलो ४२ रुपयेप्रमाणे शेतकºयांना हरभरा बियाणे वाटप करण्यात येत आहे, तर बाजारात प्रतिकिलो ७० ते ७५ रुपयेप्रमाणे हरभरा बियाण्याचे दर आहेत.शासनाच्या योजनेंतर्गत बीजोत्पादनासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना प्रत्येकी २० किलो हरभरा बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत परमिट वाटप करण्यात येत आहे.-राजेंद्र निकम,जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

अनुदानावर मिळणाºया २० किलो हरभरा बियाण्याच्या एका बॅगमध्ये एक एकरही पेरणी होत नाही. त्यामुळे अनुदानावर मिळणारे हरभरा बियाणे ही शेतकºयांची थट्टा आहे. किमान पाच एकर पेरणीसाठी पुरेल एवढे हरभरा बियाणे शेतकºयांना अनुदानावर मिळाले पाहिजे.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी