शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रासरूट इनोव्हेटर : ...आता हळद काढणीचे अवघड काम झाले सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:17 IST

हळद काढणीचे अवघड काम सोपे करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यंत्र विकसित केले आहे.

- राजरत्न शिरसाट (अकोला)

हळद काढणीचे काम अत्यंत अवघड असते. शेतकऱ्यांना यासाठी मोठ्या प्रमाणात श्रम घ्यावे लागते तसेच यात वेळही खूप जातो. हे अवघड काम सोपे करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हळद काढणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राला जॉइंट अ‍ॅग्रोस्कोची मान्यता प्राप्त झाली असून, आता हे यंत्र विद्यापीठाकडे उपलब्ध झाले आहे.जॉइंट अ‍ॅग्रोस्कोत मान्यता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा समावेश अधिक होता.

राज्यात सांगली, सातारा, मराठवाडा व विदर्भात हळदीचे पीक घेतले जाते. दोन-तीन वर्षांपूर्वी राज्यात १.२३ लाख हेक्टर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड करण्यात आली होती. दरवर्षी हे क्षेत्र वाढतच आहे. याचाच विचार करू न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी अभियांत्रिकी कृषी शक्ती व अवजारे विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक खांबलकर व डॉ. धीरज कराळे यांनी हे यंत्र विकसित केले आहे. हळद फायदेशीर पीक आहे. तथापि, काढणीसाठी एकूण पीक उत्पादनाच्या खर्चात जवळपास ३० ते ४० टक्क्यांपर्यंत खर्च येतो. पिकाच्या काढणीसाठी हळद पिकाची काढणी मजुरांच्या साहाय्याने केली तर यासाठी आठपट मजूर जास्त लागतात.

या पिकाची व्यावसायिक उपयोगिता व वेळेची बचत बघता हळद काढणी यंत्र प्रभावी ठरले असल्यामुळे या यंत्राला राज्यस्तरीय जॉइंट अ‍ॅग्रोस्कोमध्ये मान्यता प्राप्त झाली आहे. ट्रॅक्टरवर चालणाऱ्या या यंत्राचा जमिनीतून हळद काढण्याचा खर्च प्रतितास केवळ २३५ रुपये आहे. यंत्राच्या वापरामुळे हळकंद काढण्याच्या खर्चात पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ३३.२१ टक्के बचत होते. हे यंत्र केवळ अडीच हजार रुपयांचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी