शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामातील बियाण्यांवर राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:43 IST

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने गहू, हरभरा बियाण्यांचे नियोजन केले असून, राष्ट्रीय  अन्नसुरक्षा अभियान व ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना भरीव अनुदान दिले जाणार आहे.

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने गहू, हरभरा बियाण्यांचे नियोजन केले असून, राष्ट्रीय  अन्नसुरक्षा अभियान व ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना भरीव अनुदान दिले जाणार आहे.केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अन्न सुरक्षा व ग्राम बीजोत्पादन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रब्बी हंगामातील चार प्रमुख पिकांसाठी ६० व ४० टक्के या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामात यावर्षी हरभरा हे प्रमुख पीक राहणार असून, महाबीजने यावर्षी २.३१ लाख क्ंिवटल बियाणे विक्रीस उपलब्ध केले आहे. यातील १.१५ लाख क्ंिवटल बियाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत उपलब्ध आहे. या अंतर्गत शेतकºयांना पाच गोण्यांच्या मर्यादेनुसार प्रतिक्ंिवटल २,५०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत एक एकर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत तीन हजार रुपये प्रतिक्ंिवटल अनुदान दिले जाणार आहे.गहू बियाण्यांसाठी राष्ट्रीय  अन्न सुरक्षा अभियान योजना सोलापूर, बीड व नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, त्यासाठीचे अनुदानाचे दर हे १० वर्षाच्या आतील अनुसूचित वाणास किमतीच्या ५० टक्के अनुदान उपलब्ध राहील, तर वर्षावरील वाणास प्रतिक्ंिवटल एक हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे. तर ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत गहू पिकाच्या सर्व वाणांसाठी प्रतिक्ंिवटल १,६०० रुपये अनुदान उपलब्ध आहे. रब्बी ज्वारीसाठी १० वर्षाआतील वाणासाठी प्रतिक्ंिवटल तीन हजार रुपये तर १० वर्षाच्यावरील वाणासाठी १,५०० रुपये अनुदान असणार आहे. करडई या पिकासाठीसुद्धा १० वर्षाआतील वाणांसाठी प्रतिक्ंिवटल ३,८५० रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

गहू, हरभरा, ज्वारी व करडई रब्बी हंगामातील या प्रमुख पिकांसाठी भरीव अनुदान उपलब्ध करण्यात आले असून, राज्यातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील नजिकच्या कृषी विभाग कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक महाबीज, अधिकृत विक्रेते व उपविके्रत्यांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.रामचंद्र नाके, महाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीज