शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

नातवाच्या सुटकेसाठी आजीचा न्यायालयाच्या दरवाजातच जादूटोणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 15:41 IST

रामदास पेठ पोलिसांनी मंगळवारी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अकोला - मूर्तिजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनयभंग तसेच पोक्सो कायद्यात आरोपी असलेल्या एका युवकाच्या सुटकेसाठी त्याच्या आजीने प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाच्या दरवाजाजवळ सुगंधीत मोहरी टाकून मंत्र मंतरले आणि त्यानंतर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडल्यानंतर या प्रकरणाचा तपास करून रामदास पेठ पोलिसांनी मंगळवारी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मूर्तिजापूर येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या समीर शाह सलीम शाह या युवकाविरुद्ध मूर्तिजापूर पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून या आरोपीस अटक केली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाच्या आदेशान्वये आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर कारागृहात असलेल्या आरोपीची जमानत घेण्यासाठी त्याच्या नातेवाइकांनी न्यायालयात धाव घेतली; मात्र गत अनेक दिवसांपासून जामीन मिळत नसल्याने या आरोपीच्या कुटुंबातील त्याची आजी आणि आणखी एक अशा दोन बुरखाधारी महिला शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात आल्या. या दोन महिलांमधील जरीनाबी नरसुल्ला शाह (४८) रा. अकोट फैल या महिलेने तिच्या नातवाच्या सुटकेसाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रथम यांच्या न्यायालयाच्या कक्षासमोरच सुगंधीत पिवळसर आणि पांढरी मोहरी टाकून जोरात मंत्र मंतरले. हा प्रकार न्यायालयात उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी न्यायाधीशांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिचे हे आचरण अनिष्ठ व अघोरी असल्याने आणि यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने या संदर्भात महिलेला विचारणा केली असता, तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाचे प्रभारी अधीक्षक दिनेश जनार्दन अलकरी यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून जरीनाबी शाह या महिलेविरुद्ध महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंध व अघोरी प्रथा उच्चारण अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत. देशातील पहिली घटनान्यायदेवतेच्या आवारात नातवाच्या किंवा कोणत्याही आरोपीच्या सुटकेसाठी सुगंधीत मोहरी टाकून मंत्र मंतरने तसेच जादूटोणा केल्याची ही देशातील पहिली घटना असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. यावरून आजही जादूटोणासारखे अघोरी प्रकार सुरूच असल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालयRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन