शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामसेवक धास्तावले; संरक्षण नसल्याने ग्रामसेवकांवर हल्ले वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:05 IST

अकोला : राष्ट्रीय सण म्हणून साजरा केल्या जाणार्‍या स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनी गावातील ग्रामसभांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद होतात. त्या वादात ग्रामसेवकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते होऊ नये, यासाठी त्या दिवशीच्या ग्रामसभा ग्रामसेवक घेणार नाहीत, त्याऐवजी सात दिवसांनंतर ती सभा घेण्यात येईल, असे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सचिव महेंद्र बोचरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहे.

ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी गावातील ग्रामसभांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद होतात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय सण म्हणून साजरा केल्या जाणार्‍या स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनी गावातील ग्रामसभांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद होतात. त्या वादात ग्रामसेवकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते होऊ नये, यासाठी त्या दिवशीच्या ग्रामसभा ग्रामसेवक घेणार नाहीत, त्याऐवजी सात दिवसांनंतर ती सभा घेण्यात येईल, असे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सचिव महेंद्र बोचरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही दिवशी होणार्‍या ग्रामसभा वादळी होतात. त्यामध्ये ग्रामसेवकांना मारहाण, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, दप्तर पळविणे, ते फाडून टाकणे, यासारखे प्रकार घडतात. त्या सभांना पोलीस संरक्षण मागितल्यास ते मिळत नाही. त्यामुळे समाजकंटकांच्या हल्ल्याला एकटा ग्रामसेवक बळी पडतो. या सगळ्या प्रकारांचा विचार केल्यानंतर ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने त्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अकोला जिल्हय़ातही सभांना पोलीस संरक्षण दिल्या जात नाही, तोपर्यंत या दोन्ही राष्ट्रीय सणांच्या दिवशी ग्रामसेवक ग्रामसभा घेणार नाहीत, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

- १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही राष्ट्रीय सणाच्या दिवशी राज्यभरात ग्रामसभा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्या दिवशी नागरिक सण साजरे करीत असताना ग्रामसेवकाला नागरिक व असामाजिक तत्त्वाच्या हल्ल्यांना बळी पडावे लागते.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणgram panchayatग्राम पंचायत