शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

गुणपत्रिकेऐवजी आता ग्रेडपत्रिका!

By admin | Updated: December 10, 2014 00:06 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

अकोला : गुणांची जीवघेणी स्पर्धा थांबावी आणि विद्यार्थ्यांना निसंकोचपणे पुढे जाता यावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आता गुणपत्रिकेऐजवी ग्रेडपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील सुचना आयोगाने सर्व विद्यापीठांना केल्या असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना यापुढे गुणवत्तेनुसार ग्रेड देण्यात येणार आहेत. शालेयस्तरावर विद्यार्थ्यांमध्ये सुरु असलेली जीवघेणी स्पर्धा थांबविण्यासाठी ग्रेड पद्धती सुरु करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठस्तरावर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनादेखील ग्रेड पद्धती देण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगाने केला आहे. गुण पद्धतीमध्ये एखादा जरी गुण कमी मिळाला तरी विद्यार्थ्यांंची मानसिकता ढासळते. अनेकवेळा निराशेच्या गर्तेत गेलेले विद्यार्थी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येसारखा मार्गदेखील निवडतात. त्यामुळेच सर्व विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी गुणांकन पद्धती बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. पाश्‍चात्य देशांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ह्यक्रेडिट बेस्ट सिस्टिमह्णआहे, आता त्याच धर्तीवर ह्यचॉईस बेस्ट मार्कींग सिस्टिमह्ण लागू करण्यात येत आहे. चॉईस बेस्ट मार्कींग सिस्टिममध्ये विद्यापीठांतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्स हे अभ्यासक्रम शिकणार्‍या विद्यार्थ्यांंना सेमिस्टरनंतर ग्रेड सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. याचा उद्देश प्रत्येक सेमिस्टरमध्ये ठरवलेले विषय त्याच कालावधीत शिक्षकांनी शिकविणे व त्याचे विद्यार्थ्यांना योग्य आकलन करुन देणे, हा आहे. ग्रेड पद्धती लागू झाल्यानंतर परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ग्रेड दिले जाणार असून, त्यासाठी १0 पॉईंटची ग्रेड पद्धती ठरविण्यात आली आहे. अशा राहतील ग्रेडए प्लस -            एक्सलन्टए ग्रेड -             व्हेरी गुडबी प्लस-           गुडसी -                  पासएफ -                नापास