शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

पारदर्शितेसाठी ग्रामसभांचे राज्यात प्रथमच थेट प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:17 IST

एकाच दिवशी ग्रामसभा घेत त्यामध्ये पारदर्शिता ठेवण्यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा राज्यातील पहिला उपक्रम अकोला जिल्हा परिषदेने शनिवारी राबविला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५२६ पैकी २५२ ग्रामपंचायतींच्या सभांचे थेट प्रक्षेपण झाले. तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, पोटनिवडणुकीमुळे ग्रामसभा झाल्या नाहीत. आॅफलाइन चित्रीकरण केलेल्या ग्रामपंचायतीचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केले जाणार आहेत.

अकोला : ग्रामीण भागातील विकास योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ग्रामसभा घेत त्यामध्ये पारदर्शिता ठेवण्यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा राज्यातील पहिला उपक्रम अकोला जिल्हा परिषदेने शनिवारी राबविला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील ५२६ पैकी २५२ ग्रामपंचायतींच्या सभांचे थेट प्रक्षेपण झाले. तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, पोटनिवडणुकीमुळे ग्रामसभा झाल्या नाहीत. तेथे २५ जून रोजी सभा होणार आहेत.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी २२ जून रोजी विशेष ग्रामसभा घेऊन विविध विषयांचे ठरावही घेण्याचे पत्र सरपंच, सचिवांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक गावातील ग्रामसभेसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली. गावांमध्ये एकाच वेळी झालेल्या ग्रामसभांमध्ये प्रधानमंत्र्यांच्या पत्राचे वाचन करण्यात आले. त्याशिवाय, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ठरवून दिलेल्या नियोजनाच्या पत्रानुसार आयुष्यमान भारत योजनेची लाभार्थी यादी वाचन, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी ‘सेल्फ’ तयार करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंबांची यादी तयार करणे, जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाºया सर्व योजनांची माहिती देणे, रमाई घरकुलासाठी लाभार्थी निवड करणे, पाण्याचे महत्त्व पटवून देणे, पाणी संवर्धनासाठी श्रमदान करावे, त्यामध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घेण्यात आले. ज्या तहकूब झालेल्या ग्रामपंचायतींच्या सभांमध्ये सर्व विषयाचे वाचन व माहिती देण्यात आली. लाभार्थी निवड करण्यात आली नाही. तसेच आॅफलाइन चित्रीकरण केलेल्या ग्रामपंचायतीचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केले जाणार आहेत.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या हरिभाऊ वाघोडे यांनी अकोला तालुक्यातील ग्रामपंचायत वाशिंबा येथे ग्रामसभेत मार्गदर्शन केले.- पहिल्याच टप्प्यात २५२ ग्रामपंचायतींचे प्रक्षेपणअकोला तालुक्यातील ९७ पैकी ९० ग्रामपंचायतींमध्ये सभा झाली. त्यापैकी सात ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक आहे. १२ सभा तहकूब झाल्या. ५१ ग्रामसभांचे थेट प्रक्षेपण झाले. अकोट तालुका - ८५ पैकी ४९ प्रक्षेपण, बाळापूर तालुका - ६६ पैकी ४६ ग्रामसभांचे प्रक्षेपण, बार्शीटाकळी - ८० पैकी ३७ ग्रामपंचायतींचे थेट प्रक्षेपण, पातूर तालुका- ५७ पैकी २३ प्रक्षेपण, मूर्तिजापूर तालुका- ८६ पैकी २६ प्रक्षेपण, तेल्हारा तालुक्यात सभा सुरू होत्या.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत