शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

ग्रामपंचायत सदस्यांनाच शौचालयाचा विसर

By admin | Updated: February 11, 2015 01:14 IST

मेहकर तालुक्यात ग्रा.पं.च्या ३२३ सदस्यांकडे शौचालय नाही.

रफिक कुरेशी /मेहकर (बुलडाणा): मेहकर तालुक्यात ९८ ग्राम पंचायममध्ये ८५६ सदस्य असून, यापैकी ५३३ ग्रा.पं. सदस्यांनीच पंचायत समितीकडे शौचालय असल्याचा अहवाल जमा केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३२३ ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्याचे वास्तव समोर आले आहे.स्वच्छता अभियान वाढविण्यासाठी १ एप्रिल २0१२ रोजी संपूर्ण स्वच्छता अभियानाचे निर्मल भारत अभियान असे नामकरण करण्यात आले. याअंर्तगत शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६00 व रोहयोमधून ४ हजार ५00 रुपये अनुदान देण्यात येत होते. आता ७ नोव्हेंबर २0१४ रोजी राज्य शासनाने एक परिपत्रक काढून वैयक्तिक शौचालय बांधणार्‍या कुटुंबाला केंद्रशासनाकडून ९ हजार व राज्य शासनाकडून ३ हजार असे एकूण १२ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. शासनाने राज्यातील ग्रामपंचायत सदस्य व इतर संबंधित कर्मचार्‍यांकडे शौचालय बांधणे बंधनकारक केले आहे. मेहकर तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून, ८५६ ग्रामपंचायत सदस्य आहे त. यापैकी ५३३ ग्रा.पं. सदस्यांनीच पंचायत समितीकडे शौचालय असल्याचा अहवाल जमा केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्राम पंचायतच्या ३२३ सदस्यांकडेच शौचालय नसल्याचे निर्दशनास आले आहे. यावरून आजही अनेक ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नसल्याने शासनाच्या नियमाला मूठमाती दिली जात असल्याचे दिसते.यासंदर्भात गटविकास अधिकारी गजानन पाटोळे यांनी ज्या सदस्यांकडे शौचायलय नाही त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करुन तालुका १00 टक्के हगणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे लोकमतशी बोलताना सांगीतले.