अकोला: ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर मतमोजणी दुसर्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी उ पविभागीय अधिकारी व तहसीलमध्ये करण्यात येते. मात्र, यामध्ये बदल करून ग्रामपंचायतचे मतदान झाल्यानंतर मतमोजणी त्याच दिवशी व त्याच केंद्रावर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम तहसील कार्यालयातून चालतो. वर्ग २ किंवा वर्ग ३ मधील अधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतात. निवडणूक आयोगाने मात्र आता यामध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. यापुढे या निवडणुकीचा कार्यक्रम ग्रामपंचायतमधूनच चालविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे. यानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज सादर करतील. त्यानंतर या अर्जाची एक प्रत ग्रामपंचायतमध्ये असलेल्या निवडणूक निर्णय अधिकार्याला देतील. हे अधिकारी उमेदवाराचा अर्ज मिळाल्याचे ऑनलाइन वरिष्ठ कार्यालयाकडे कळव तील. त्यानंतर मतदानाच्या दिवशी गावात मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी उपस्थित राहतील. मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी केली जाईल व त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात येईल. एकाच दिवसात मतदान व मतमोजणी घेण्याचा शासनाचा निर्णय असला तरी याचे दुष्परिणामही अधिक असल्याचे अधिकारी- कर्मचार्यांचे म्हणणे आहे. मतदान केंद्रावर मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असली तरी कधीकधी रात्री ८ वाजेपर्यंत मतदान चालते. त्यानंतर निकाल ऐकण्यासाठी मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या सर्मथकांची गर्दी असते. रात्री निकाल जाहीर करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यात एकाचवेळी अनेक गावांमध्ये निवडणुका असल्यामुळे पोलीस बंदोबस्तातही र्मयादा येऊ शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा अनेक कर्मचारी व अधिकारी विरोध करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता मतदान केंद्रांवरच?
By admin | Updated: May 16, 2015 00:46 IST