शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आठवडा उलटला; पण ‘त्या’ धान्यसाठ्याचा लागेना शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:28 IST

आठवडा उलटला; मात्र जप्त केलेला काळाबाजारातील ‘रेशन’चा हा धान्यसाठा आला कोठून, याबाबतचा शोध अद्याप जिल्हा पुरवठा विभागाला लागला नाही.

अकोला : ‘एमआयडीसी’स्थित ट्रान्सपोर्ट नगरमधील एका खासगी गोदामात बेकायदेशीर साठविण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा १५२ क्विंटल ‘रेशन’चा धान्यसाठा गत आठवड्यात जप्त करण्यात आला होता. आठवडा उलटला; मात्र जप्त केलेला काळाबाजारातील ‘रेशन’चा हा धान्यसाठा आला कोठून, याबाबतचा शोध अद्याप जिल्हा पुरवठा विभागाला लागला नाही.अकोला शहरानजीक ‘एमआयडीसी’मधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये सिंधी कॅम्पमधील शीतलदास धर्मदास वाधवानी यांनी भाड्याने घेतलेल्या एका खासगी गोदामात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गत ३० नोव्हेंबर रोजी धाड टाकली असता, गोदामात बेकायदेशीर साठविलेला सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत (रेशन)चा पाच लाख रुपये किमतीचा १२५ क्विंटल गहू आणि २७ क्विंटल तूर डाळ असा एकूण १५२ क्विंटल धान्यसाठा जप्त करण्यात आला होता. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गतचा धान्यसाठा खासगी गोदामात बेकायदेशीररीत्या कसा साठविण्यात आला, हा धान्यसाठा कोठून आला, याबाबतचा शोध घेण्यासाठी अकोला शहर, अकोला ग्रामीण, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील रास्त भाव दुकानांची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या पथकांमार्फत रास्त भाव दुकानांची तपासणी करण्यात आली; परंतु धान्यसाठा जप्त करून आठ दिवसांचा कालावधी उलटला असला, तरी बेकायदेशीर साठविण्यात आलेला धान्यसाठा आला कोठून, यासंदर्भात ८ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा पुरवठा विभागाला कोणताही शोध लागला नाही.रास्त भाव दुकानांच्या तपासणीचा अहवाल ‘डीएसओं’कडे!अकोला शहरातील रास्त भाव दुकानांची तपासणी पुरवठा विभागाच्या चार पथकांमार्फत ४ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आली. तपासणीत आॅगस्ट ते नोव्हेंबर अखेरपर्यंत रास्त भाव दुकानांमध्ये धान्याची करण्यात आलेली उचल, शिधापत्रिकाधारकांना वितरित केलेले धान्य आणि दुकानात शिल्लक असलेला धान्यसाठा इत्यादी प्रकारची माहिती तपासणी पथकांकडून घेण्यात आली असून, तपासणीचा अहवाल पथकांमार्फत जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे (डीएसओ) सादर करण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार