शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पदवीधरांचे रण‘जित’ !

By admin | Updated: February 7, 2017 03:30 IST

भाजपाचा सलग दुसरा विजय; मुख्यमंत्र्यांसह पक्षाची प्रतिष्ठा कायम

अकोला, दि. ६- वर्षभराआधीपासून मतदार नोंदणीसाठी मेहनत घेऊन केलेली मतदार नोंदणी न्यायालयाने ऐनवेळी रद्द केली, भाजपा अंतर्गत गटबाजी फोफावली, संपत्तीसह खोट्या शप थपत्रांची प्रकरणे उकरून काढण्याची मोहीम सुरू झाली, काँग्रेसने प्रथमच तगडा उमेदवार देऊन निवडणूक प्रचाराची राळ उडवली, तर काही उमेदवारांसाठी समाजाच्या नावावर म तदान जुळविण्याची खेळी सुरू झाली, अशा सर्व पृष्ठभूमीवर डॉ.रणजित पाटील यांनी पदवीधर मतदारसंघाचे ह्यरणह्ण पुन्हा ह्यजितह्ण करून भाजपाला सलग दुसरा विजय मिळवून दिला आहे. तसं पाहिलं तर, या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच डॉ. रणजित पाटील यांचे पारडे जड होते. वर्षभराआधीच डॉ.पाटील हे निवडणुकीच्या तयारीला लागले होते. पाचही जिल्ह्यांतील विविध सामाजिक संघटना, युवा मंडळे, महिलांच्या संघटना यासोबतच बुलडाणा अर्बनसारख्या पतसंस्था अन् मोठय़ा शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून मतदार नोंदणी करण्यास डॉ.पाटील यांनी प्राधान्य दिले. नोंदविलेला मतदार या मतदानाला जाईल इथपर्यंत या निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे कधीकाळी गुपचूप होणारी ही निवडणूक प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीसारखी रंगतदार झाली. या नियोजनाचे फळ डॉ.पाटील पर्यायाने भाजपाच्या पदरात पडले आहे. यशाचे बाप हजार असतात, असे म्हटले जाते; परंतु या निवडणुकीत यशाचे ङ्म्रेय हे मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ करणारे कार्यकर्ते अन् डॉ.पाटील यांच्या संयमी नियोजनालाच द्यावे लागेल. निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही वादांवर भाष्य करून प्रकरणे वाढविण्यापेक्षा संयम अन् सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळेच गटबाजीचा फटका म तदानात बसल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. दुसरीकडे काँग्रेसने दिलेली टक्कर ही तितकीच महत्त्वाची आहे. काँग्रेसने प्रथमच या मतदारसंघात अधिकृत उमेदवार जाहीर केला होता. संजय खोडके यांचे नेटवर्क, मॅनेजमेंट कौशल्य याचा विचार करून त्यांची निवड केली. खोडके यांनीही पाचही जिल्हे पिंजून काढत, ही निवडणूक चुरशीची केली; मात्र ते विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. उमेदवार हा निवडणूक लढत असतो; पण कार्यकर्तेही निवडणुकीत झोकून देतात; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक ह्यनिवडणुकीसारखीह्ण लढली नाही तर या दोन्ही पार्टीचे नेते खोडके यांना बळ देण्यात कमी पडले, हे मान्यच करावे लागेल. प्रहारच्या बच्चू कडू यांनीही निवडणुकीत झोकून देत डॉ.दीपक धोटे यांच्यासाठी घेतलेली मेहनत रंग घेऊ शकली नाही अन् डॉ.अविनाश चौधरी यांच्यासाठी एकवटलेला समाजही त्यांना यशापर्यंत पोहोचवू शकला नाही. मुळातच ही निवडणूक सुशिक्षितांची निवडणूक आहे. शिक्षण क्षेत्रातील संघटनांचा बोलबाला या निवडणुकीत असायचा; पण आता तो पूर्णपणे संपला असून, ही निवडणूक शतप्रतिशत राजकीय झाली आहे, त्यामुळे साम-दाम-दंड-भेद या निवडणुकीत घुसले, ते आता बाहेर निघणार नाही, त्यामुळे येणार्‍या काळात या निवडणुकीचे व निवडणुकीतील जय-पराजयाचे कवीत्व सुरूच राहणार आहे. नाटकाचा एक अंक संपला. दूसरा आता अकोला महापालिका निवडणूक निकालानंतरच सुरू होईल. या निकालाने ज्यांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे; सध्या तरी भाजपाने मुख्यमंत्र्यांचा ह्यसिंहह्ण जिंकला असून महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा ह्यगडह्ण सर करण्यासाठी हा निकाल संजीवनी देणारा ठरला आहे, यात कुणाचेही दुमत नसावे!