शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘जीपीएफ’ खाते सुरू करण्याबाबत वेतन, भविष्य निर्वाह निधी पथक उदासीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:35 IST

भविष्य निर्वाह निधी पथक दुर्लक्ष करून अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे ‘जीपीएफ’ खाते सुरू करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप काही शिक्षकांनी केला आहे.

अकोला : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकशिक्षकेतर कर्मचाºयांना शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे भविष्य निर्वाह निधी योजनेऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजनेचे खाते उघडण्याची सक्ती केली होती. त्यामुळे काही शिक्षक, कर्मचाºयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने शिक्षक, कर्मचाºयांच्या बाजूने अंतरिम आदेश दिल्यामुळे या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे ‘जीपीएफ’ खाते सुरू करण्याचा शिक्षण उपसंचालक शरद खंडागळे यांनी ११ सप्टेंबर रोजी आदेश दिला आहे; परंतु या आदेशाकडे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक दुर्लक्ष करून अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे ‘जीपीएफ’ खाते सुरू करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप काही शिक्षकांनी केला आहे.राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरू केली. अनेक शाळांना शासनाकडून १०० टक्के अनुदान मिळत नसल्यामुळे या सर्वांना जुनी पेन्शन योजना आणि भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळत नव्हता. एवढेच काय, तर त्यांचे भविष्य निर्वाह निधी योजनेंतर्गत खातेदेखील उघडण्यात आले नव्हते. त्यांच्यावर नवीन अंशदायी पेन्शन योजनेचे खाते उघडण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. पुढे या शाळांना शासनाकडून १०० टक्के अनुदान मिळाल्यानंतर नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी नवीन अंशदायी पेन्शन योजनेला विरोध सुरू केला. तसेच मुंबई उच्च न्यायालयातसुद्धा याचिका दाखल करून जीपीएफ खाते सुरू करण्याची मागणी केली होती. यावर उच्च न्यायालयाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुषंगाने अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक शरद खंडागळे यांनी पाचही जिल्ह्यांमधील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाला १ नोव्हेंबर २00५ पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचेच जीपीएफ खाते सुरू करण्याचा आदेश दिला. त्यामुळे अनेक शिक्षक कागदपत्रांसह शिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाकडे जात आहेत; परंतु शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाकडे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक दुर्लक्ष करून शिक्षक, कर्मचाºयांना थेट घरचा रस्ता दाखवित असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार आमचे ‘जीपीएफ’ खाते सुरू करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.

शिक्षण संचालकांनी अद्याप कोणताही आदेश आम्हाला दिलेला नाही. त्यांचे पत्रही नाही, त्यामुळे आम्ही २00५ पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नवीन ‘जीपीएफ’ खाते सुरू करण्यास असमर्थ आहोत. तसा आदेश प्राप्त झाल्यावर खाते सुरू करू.- सतीश मुगल, अधीक्षकवेतन व भविष्य निर्वाह निधी पथक

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक