शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीचा सादर केला नाही खर्च : १0५ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:16 IST

अकोला : निवडणूक निकालानंतर ३0 दिवसात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना, जिल्हय़ातील मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या, मात्र विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांवर पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरण्याच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : निवडणूक निकालानंतर ३0 दिवसात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना, जिल्हय़ातील मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या, मात्र विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांवर पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरण्याच्या कारवाईची टांगती तलवार आहे.जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल गत ९ ऑक्टोबर २0१७ रोजी जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर ३0 दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी निवडणूक खर्च संबंधित तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. नियमानुसार विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येते. त्यानुषंगाने विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना देण्यात आला होता. त्यानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील ६४ आणि पातूर तालुक्यातील ४२ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर केला नसल्याचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाला प्राप्त झाला. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर केला नसल्याने, संबंधित उमेदवारांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरविण्याच्या कारवाईसाठी उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या, मात्र विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याच्या  कारवाईची टांगती तलवार आहे.

पाच तालुक्यातील उमेदवारांचा अहवाल अप्राप्त - ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यांतील उमेदवारांचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आले. - अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी व तेल्हारा या पाच तालुक्यातील निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून अद्यापही सादर करण्यात आला नाही. - या पाच तालुक्यातील उमेदवारांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक