शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणूक : उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे अहवालच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:22 IST

जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर केवळ दोन तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, पाच तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचे अहवाल अद्यापही तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.

ठळक मुद्देदोन तालुक्यांतील खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचे अहवाल प्राप्त

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर ३0 दिवसांत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे; मात्र गत ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर केवळ दोन तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, पाच तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचे अहवाल अद्यापही तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गत ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले व निवडणुकांचे निकाल ९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच पदांसाठी ८९६  आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी २ हजार ७५५ अशा एकूण ३ हजार ६५१ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर ३0 दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी निवडणूक खर्च संबंधित तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना देण्यात आला होता. त्यामध्ये पातूर व मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचे अहवाल संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आले असून, जिल्ह्यातील उर्वरित पाच तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या मात्र निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचे अहवाल अद्यापही संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आले नाही.

‘या’ तालुक्यातील प्रलंबित आहेत अहवालग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या मात्र निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचे पाच तालुक्यांतील अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामध्ये अकोला, अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी व बाळापूर या पाच तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचे अहवाल संबंधित कार्यालयामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. 

मूर्तिजापुरातील उमेदवारांची २ फेब्रुवारीला सुनावणी!ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर न करणार्‍या पातूर व मूर्तिजापूर तालुक्यातील उमेदवारांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने मूर्तिजापूर तालुक्यातील निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांची सुनावणी २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.-

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक