शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या हस्ते गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:39 IST

अकोला: गोवर तसेच रुबेला या विषाणूपासून जीवघेणे आजार होतात. या आजारावर मात करण्यासाठी आजपासून राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले.

अकोला: गोवर तसेच रुबेला या विषाणूपासून जीवघेणे आजार होतात. या आजारावर मात करण्यासाठी आजपासून राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले. मंगळवारी महापौरांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. ही मोहीम आणखी २० दिवस राहणार आहे.शहरात मंगळवारपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत वयाची ९ महिने पूर्ण केल्यापासून ते १५ वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना मोफत लसीकरण केले जाणार आहे. रुबेला आजारामुळे गर्भवती माता किंवा तिच्या बाळाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता राहते. मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेच्या वतीने शहरात विविध दहा ठिकाणी नागरी आरोग्य केंद्रे कार्यरत करण्यात आले आहेत. या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जात आहे. महापौर विजय अग्रवाल यांच्यासह जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश पगारे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, डॉ. प्रभाकर मुद्गल यांची उपस्थिती होती. यावेळी महापौर अग्रवाल यांच्या हस्ते लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. डाबकी रोडवर उपमहापौर वैशाली शेळके तसेच लक्कडगंज येथील मनपा शाळेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.१ लाख १५ हजार ४१६ बालकांना लस!गोवर व रुबेला लसीकरण मोहीम तीन टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील शाळा व अंगणवाडीतील १ लाख १५ हजार ४१६ बालकांना लस दिल्या जाईल. यासाठी मनपाने ८३४ लसीकरण सत्र आयोजित केले आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर दोन टप्प्यात मोहीम राबवली जाईल. मोहिमेच्या पहिल्या दिवशी ५ हजार ६८३ विद्यार्थ्यांपैकी एकूण ३४५९ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. 

 

टॅग्स :Akolaअकोला