शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांच्या बालकांना दिली गोवर-रुबेला लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:44 IST

अकोला : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचा मुलगा आयमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची मुलगी नैनिका ...

अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचा मुलगा आयमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची मुलगी नैनिका यांना बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोवर-रुबेलाची लस देण्यात आली.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, त्यांची पत्नी डॉ. मानसाराव कलासागर, आयमानची आई तथा वाशिमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. के.एस. घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांची उपस्थिती होती.आयमान व नैनिकाला गोवर-रुबेलाची लस टोचल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले. गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा २७ नोव्हेंबर पासून अकोला जिल्ह्यात प्रारंभ झाला. पाच आठवडे चालणाºया या मोहिमेत ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही लस दिली जाणार आहे. जिल्हयातील सर्व शाळा, मदरसा येथे प्रशिक्षित आरोग्य कर्मचाº्यांमार्फत बालकांना ही लस टोचली जात आहे. ही लस मोफत असून त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीसुध्दा लसीकरण केले जाते.जिल्हयातील ९ महीने ते १५ वर्षाखालील सुमारे ४ लाख २७ हजार ८७२ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. प्रथम सत्रात शालेय स्तरावर लसीकरण करण्यात येणार आहे. शिक्षकांनी व पालकांनी कर्तव्यदक्ष आणि जागरूक होऊन आपल्या बालकांचे लसीकरण झाले असल्याची खात्री करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय