शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१ तारखेला वेतन अदा करण्याचा शासन निर्णय; मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:39 IST

शिक्षण विभागाकडून शासनाच्या निर्णयाला हरताळ फासला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शिक्षक महासंघाने केला आहे.

अकोला: राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील कार्यरत शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला नियमित वेतन अदा करण्याचा आदेश शासनाने वेळोवेळी दिला आहे; परंतु शिक्षण विभागाकडून शासनाच्या निर्णयाला हरताळ फासला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शिक्षक महासंघाने केला आहे. तसेच खासगी शिक्षक संघटना, विमाशिसं, विज्युक्टाने यंदा दिवाळीपूर्वी तरी शिक्षकांना वेतन द्यावे, अशी शिक्षण उपसंचालकांकडे शुक्रवारी मागणी केली आहे.जिल्ह्यातील वेतन पथक अधीक्षक शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता, त्यांच्या पद्धतीने वेतन देयके अदा करतात. असे असले तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. शासन निर्णयानुसार १ तारखेला वेतन अदा करणे अपेक्षित असताना, वेतन पथक अधीक्षकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. शासन निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन नियमित वेळेवर मिळण्यासाठी पाचही जिल्ह्यांतील वेतन पथक अधीक्षकांना आदेश द्यावा, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता माहे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी व तसेच दर महिन्याचे वेतन १ तारखेला अदा न केल्यास संबंधित वेतन पथक अधीक्षक यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्यासह शिक्षक संघटनांनी केली आहे. अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक