शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची कर्जमाफी शेतकर्‍यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:09 IST

अकोला : कर्जमाफीच्या मुद्यावरून भाजप सरकारने शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा चालविली आहे. फडणवीस सरकारची कर्जमाफी ‘फ सवी’ असून, शेतकर्‍यांच्या मुळावर उठली असल्याचा घणाघाती हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला.

ठळक मुद्देवीज कापून शेतकर्‍यांचा बळी; अनिल देशमुख यांचे टीकास्त्र

अकोला : कर्जमाफीच्या मुद्यावरून भाजप सरकारने शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा चालविली आहे. फडणवीस सरकारची कर्जमाफी ‘फ सवी’ असून, शेतकर्‍यांच्या मुळावर उठली असल्याचा घणाघाती हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला. हा प्रकार कमी म्हणून की काय, आता शेतकर्‍यांच्या वीज तोडणीसाठी महावितरणने उचलेले पाऊल पाहता शेतक र्‍यांचा बळी घेण्यासाठी शासन उतावीळ असल्याचे टीकास्त्र अनिल देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सोडले. दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याचा भाजप सरकारचा दावा फोल ठरला आहे. कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभ्या राहणार्‍या शेतकर्‍यांच्या हातात शासनाने तुरी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला. कर्जमाफीची ऑनलाइन प्रक्रिया शासनाच्या अंगलट आली आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या अद्यापही प्रसिद्ध केल्या नाहीत. शेतकर्‍यांची दिवाळी अंधकारमय करणार्‍या शासनाकडे सोयाबीन, कापसाला हमीभाव देण्यासंदर्भात कोणतेही नियोजन नाही. गुजरातमध्ये निवडणुकीच्या तोंडावर शेतमालाला हमीभाव घोषित केले जातात. सत्ता स्थापन केल्यानंतर सोयाबीनला सहा हजार रुपये व कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये भाव देण्याची घोषणा भाजप सरकारने केली होती. ही घोषणा केव्हाचीच हवेत विरली आहे. महाराष्ट्रात शासनाने तातडीने हमीभाव जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असून, आंदोलनाची दिशा निश्‍चित केली जाणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेला राकाँचे उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, श्रीकांत पिसे पाटील, आशा मिरगे, संग्राम गावंडे, मंदा अहेरकर, नगरसेवक अजय रामटेके, मोहम्मद फजलू, मनोज गायकवाड, अफसर कुरेशी, गौतम गवई व बुढन गाडेकर उपस्थित होते.

वीज तोडणीसाठी शासन उतावीळवीज देयके थकीत असल्याची सबब पुढे करून महावितरण कंपनीच्या आडून राज्य शासन शेतकर्‍यांच्या वीज तोडणीसाठी उतावीळ झाल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये कोळशाचे योग्यरीत्या नियोजन न केल्यामुळे संपूर्ण राज्याला भारनियमनाला सामोरे जावे लागले. शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे शासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राकाँचे नेता देशमुख यांनी दिला. 

६ नोव्हेंबरला अधिवेशनराज्य सरकारने मागील तीन वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांची घोर निराशा केली आहे. कर्जमाफी, तूर खरेदीच्या मुद्यावरून शेतकर्‍यांची केलेली थट्टा व सोयाबीन, कापूस पिकासह इतर पिकांना अद्यापही हमीभाव जाहीर करण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारच्या विरोधात दिशा ठरविण्यासाठी ६ ते ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.