शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शासन महसूल विभागाच्या पाठीशी- रणजित पाटील

By admin | Updated: February 2, 2015 01:46 IST

अकोल्यात तहसीलदार संघटनेचे विभागीय अधिवेशन.

अकोला : शासनाचा कणा असलेल्या महसूल विभागाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार आहे, अशी ग्वाही राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे दिली. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या अमरावती विभागीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे, वाशिमचे जिल्हाधिकारी आर. जी. कुळकर्णी, अमरावतीचे उपजिल्हाधिकारी अजय लहाने, अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे, विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे उपस्थित होते. डॉ. पाटील पुढे म्हणाले की, महसूल विभाग महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. त्यामधील सर्वांनाच कालबद्ध पदोन्नती मिळाली पाहिजे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यास चालना दिली जाईल. शेतकर्‍यांना मदतवाटप करण्याची जबाबदारी पार पाडणार्‍या महसूल विभागांतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयस्तरावर एक साहाय्यक लेखाधिकारी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांपर्यंत योजना पोहचविण्याचे काम करणार्‍या महसूल विभागाच्या पाठीशी शासन उभे राहणार असून, महसूल अधिकार्‍यांवर पोलीस कारवाई किंवा त्यांची चौकशी करताना संबंधित विभागप्रमुखांना विचारात घेतले पाहिजे, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.